टीटीपीने पाकिस्तानी सैन्यावर एकापाठोपाठ दोन हल्ले केले.
सहा सैनिकांचा मृत्यू तर अनेक जखमी झाले आहेत.
असीम मुनीर संरक्षण प्रमुख झाल्यानंतर लगेच झाल्याने हा थेट आव्हान मानले जात आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे.
Why TTP targeted Pakistan Army in back-to-back Kurram attacks : तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान अर्थात TTP ने पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर निशाणा साधलाय. खैबर पख्तूनख्वा (केपी) प्रांत के कुर्रम जिल्ह्यात टीटीपीने पाकिस्तानच्या सैन्यावर दोन हल्ले केले. आमाज न्यूजच्या रिपोर्ट्सनुसार, या हल्ल्यात पाकिस्तानच्या सहा सैन्याचा मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी आहेत. मागील काही दिवसांपासून टीटीपी कडून पाकिस्तान सैन्यावर लवारंवार हल्ले केले जात आहेत..
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुर्रममधील मनाटो परिसरात TTP ने पाकिस्तानी सैन्यावर एकापाठोपाठ एक हल्ले केले. यामध्ये सहा सैन्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पाच ते सहा गंभीर जखमी आहेत. टीटीपीने केलेला हा हल्ला असीम मुनीर पाकिस्तानचे पहिले संरक्षण दल प्रमुख (सीडीएफ) झाल्यानंतर लगेचच झाला आहे. त्यामुळे असीम मुनीर यांना थेट चॅलेंज दिल्याच्या चर्चा केपी प्रांतात होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य आणि टीटीपी यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच अफगाणिस्तान बॉर्डरवरही तणावाची स्थिती आहे. पाकिस्तान दोन्ही बाजूंनी घेरला गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये टीटीपी आणि पाकिस्तानी सैन्यांमध्ये संघर्ष आणि टोकाचा होऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे. कारण, या अशांत प्रांतात पाकिस्तानी सैन्य आणि टीटीपी यांच्यात वारंवार चकमकी आणि हल्ले झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून टीटीपीविरोधात अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याला टीटीपीकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाते.
टीटीपीचे सदस्य अफगाणिस्तानात आश्रय घेतात अन् पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करतात, असा आरोप पाकिस्तानकडून केला जात आहे. काबूलमध्ये सत्तेत असलेल्या अफगाण तालिबानने हा आरोप फेटाळलाय. पण इस्लामाबाद आपल्या आरोपावर ठाम आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.