Pune PMPML Bus Accident:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Accident: पुणेकरांना पुन्हा 'संतोष माने'ची आठवण, मद्यधुंद PMPML चालकाने १०- १५ वाहनांना उडवले, थरारक VIDEO

Pune PMPML Bus Accident: पुण्यात पीएमपीएल बस चालकाने १५ गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Accident News:

पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात पीएमपीएल बस चालकाने १५ गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली. शहरातील सेनापती बापट रोडवर असलेल्या वेताळबाबा चौकामध्ये या चालकाने बेदरकारपणे बस चालवत १५ गाड्यांना उडवले. मद्यधुंद अवस्थेत त्याने हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील (Pune) सेनापती बापट रोडवर वेताळबाबा चौकामध्ये एका बसचालकाने १०- १५ वाहनांना उडवल्याची घटना समोर आली आहे. एका वाहन चालकाशी वाद झाल्यानंतर या बसचालकाने रॉंग साईडने बेदरकारपणे रिव्हर्समध्ये बस पळवत १०- १५ वाहनांना जोरदार धडक दिली.

निलेश सावंत (Nilesh Sawant) असे या बस चालकाचे नाव असून दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. या बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते. हा सगळा प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. मात्र या बसचालकाने प्रवाशांच्या जीवाची पर्वा न करता वेगाने बस चालवत वाहनांना धडक दिली.

या घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून जखमींचा निश्चित आकडा अद्याप समोर आला नाही. या प्रकरणी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Shocking : झोपेत दोघींना सापाचा दंश! काल मुलीनं जीव सोडला, आज मावशीचा मृत्यू; डोंबिवलीत हळहळ

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

Farmer Rasta Roko : पैठण- संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको; ओला दुष्काळ जाहिर करत सरसकट मोबदला देण्याची मागणी

आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या, कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, महाराष्ट्र पुन्हा हादरला!

PCOS misconceptions: PCOS विषयी महिलांच्या मनात असतात 'या' गैरसमजुती; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT