Gondia News : पोषण आहारात निकृष्ट पुरवठा; दोन महिन्यापासून विद्यार्थी जेवतात घरीच

Gondia News : पोषण आहारात निकृष्ट पुरवठा; दोन महिन्यापासून विद्यार्थी जेवतात घरीच
Gondia News Poshan Aahar
Gondia News Poshan AaharSaam tv
Published On

शुभम देशमुख 
गोंदिया
: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना शालेय पोषण आहारातच्या (Poshan Aahar) जेवनात निकृष्ट दर्जाचा अन्नपुरवठा केला जात आहे. यामुळे दोन महिन्यासून विद्यार्थी घरीच जेवण करत आहेत. शिक्षण विभागाचा (Gondia) विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ असून कंत्राटदाराचे कत्रांट रद्द करण्याची मागणी पालकांनी केली आहे. (Latest Marathi News)

Gondia News Poshan Aahar
Sanjay Raut: इतके अपयशी गृहमंत्री महाराष्ट्राने पाहिले नव्हते...; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

जिल्हा परीषदेतील शाळेतील (Zp School) विद्यार्थ्यांच्या पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरीता राज्यामध्ये २२ नोव्हेंबर १९९५ पासून इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. तर केंद्र शासनाने २००७-०८ या वर्षी या योजनेचा विस्तार करण्याचे दृष्टीकोनातून शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या गटातील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांस तर २००८-०९ पासून राज्यातील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना ही योजना लागू केली. मात्र गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील डवकी येथील जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट, खडे मिश्रित, कुबट आणि त्यावर एक्‍स्पायरी तारीख नसलेला हरभरा, मूगडाळ, तिखट, हळदी, मसाल्याचे जेवन विद्यार्थानां दिले जात आहे. ज्यामुळे डवकी शाळेतील विद्यार्थांनी सलग दोन महिन्यापासुन शाळेतील जेवनाचा त्याग केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gondia News Poshan Aahar
Jejuri Khandoba Mandir: जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा दीड महिन्यांनी दर्शनासाठी खुला; गडावर भाविकांची अलोट गर्दी

विद्यार्थ्यांना चक्क निकृष्ट दर्जाचा आणि मुदत संपलेला शालेय पोषण आहार दिला जात असल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात येत असलेल्या डवकी येथील जिल्हा परीषदेच्या शाळेत उघडकीस आला आहे. शाळेमध्ये निकृष्ट दर्जाचा आणि मुदतबाह्य दर्जाचा पोषण आहार विद्यार्थ्यांना पुरवठा केला जात प्रकार खुद्द पालकानीं पंचनामा करीत चव्हाट्यावर आणला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी गेल्या दोन महीन्यापासून शालेय पोषण आहार खाण्यास नकार दिला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com