Pune Latest News:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: सेल्फी काढला, नातेवाईकांना पाठवला अन् आयुष्य संपवलं, खडकवासला धरणात उडी मारुन विद्यार्थ्याची आत्महत्या

Pune Latest News: पुण्यातील तुडुंब भरलेल्या खडकवासला धरणात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हवेली पोलिसांनी स्थानिक रेक्सु पथकाच्या मदतीने चार तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आला.

Gangappa Pujari

सचिन जाधव| पुणे, ता. २२ ऑगस्ट २०२४

पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात खडकवासला धरणात उडी मारून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. साहिल संजय कुमार असे या मृत तरुणाचे नाव असून या घटनेने मृत तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील तुडुंब भरलेल्या खडकवासला धरणात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येआधी त्याने धरणासोबत स्वतःचा फोटो काढून तो व्हाट्सअपवर नातेवाईकांना पाठवला आणि त्यानंतर उडी मारुन स्वतःचे आयुष्य संपवले.

साहिल संजय कुमार (वय, 22) असे या मृत तरुणाचे नाव नाव आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांसह शोधपथक घटनास्थळी दाखल झाले. हवेली पोलिसांनी स्थानिक रेक्सु पथकाच्या मदतीने चार तासांच्या शोधमोहिमेनंतर साहिलचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने युवकाच्या मित्र, नातेवाईकांना मोठा धक्का बसला असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हवेली पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT