Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रेनने दिली धडक

Pune Police Died: पुण्यामध्ये ट्रेनच्या धडकेत पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वे पोलिसाला ट्रेनने धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याचा रेल्वे अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रेनने पोलिस अधिकाऱ्याला धडक दिली. पुण्यातील फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ ही घटना घडली. पुणे रेल्वे पोलिस दलात ते कार्यरत होते. सहाय्यक पोलिस उप निरीक्षक चिंतामणी साधू पवार असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनसार, ही घटना ६ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता घडली. वाडिया कॉलेजच्या पुढे असलेल्या रेल्वे क्रॉसिंगला जात असताना चिंतामणी पवार यांना रेल्वची धडक बसली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते पुणे लोहमार्गमध्ये डीएसबीमध्ये कार्यरत होते. या घटनेबाबत जीआरपी पुणे यांच्याकडे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेले पोलिस अधिकारी चिंतामणी पवार हे मूळचे अहिल्यानगरचे होते. कर्जत तालुक्यातील सिद्धटेक नवी काठी या गावाचे ते होते. ते पुण्यात कुटुंबीयांसोबत राहत होते. त्यांच्या पाश्चात पत्नी आणि मुलं असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या मूळ गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ममता बॅनर्जी थेट सुप्रीम कोर्टात वकीलाच्या भूमिकेत, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, न्यायालयात काय घडलं? VIDEO

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

मोठी बातमी! भाजपने आपले 66 नगरसेवक अज्ञातस्थळी हलवले|VIDEO

राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की लांबणार? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर नवा ट्विस्ट, VIDEO

काँग्रेसमध्ये गटबाजी, भाजप सत्ता खेचणार?

SCROLL FOR NEXT