Pune : डिलिव्हरी बॉय बनून यायचा अन् वाहनांची चोरी करायचा, चोराला पुणे पोलिसांनी अद्दल घडवली

Pune News : डिलिव्हरी बॉयच्या वेशात फिरुन वाहनांची चोरी करण्याला पोलिसांनी अटक केली आहे. वाहनांची चोरी करणाऱ्या तरुणाकडून पोलिसांनी दोन महागड्या दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
Pune News
Pune Newsx
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यात डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन वाहनांची चोरी करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. येरवडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मुसेफ अकिल शेख (वय १९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मौजमज्जा करण्यासाठी हा तरुण दुचाकी चोरत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना एक तरुण व्यक्ती येरवडा परिसरात असणाऱ्या ईशान्य मॉल येथे दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ईशान्य मॉल परिसरात संशयित तरुणाचा शोधे घेतला. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुसेफ अकील शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Pune News
Kalyan : कल्याणकरांची वाहतूक कोंडीची कटकट संपणार, यु टाईप अन् मलंगगडचे रस्ते चकाचक होणार

चौकशीदरम्यान शेखने मी मौजमज्जा करण्यासाठी दोन दुचाकी चोरल्या असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर शेखकडून येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरातून चोरलेल्या ६० हजार रुपयांच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. डिलिव्हरी बॉयच्या वेशात येऊन शेख वाहनांची चोरी करत असल्याचे समोर आले आहे.

Pune News
Ind Vs Eng 4th Test : चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह- रिषभ पंत खेळणार? टीम इंडियाबाबत मोठी माहिती समोर

पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात चोरीचा प्रकार

आंबेगाव पठार परिसरात मंगळवारी (१५ जुलै) सकाळी नऊच्या सुमारास चोरी झाली. थार कारमधून आलेल्या दोघांनी एका व्यक्तीकडील ५० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune News
Maharashtra Politics : ठाकरे बंधूंना मोठा झटका; मुंबईत एकनाथ शिंदेंची ताकद वाढली, मिळाली आंबेडकरांची साथ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com