Pune Fire x
मुंबई/पुणे

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

Pune Fire News : पुण्यात उंड्री येथील एका चौदा मजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील एका सदनिकेत आग लागली. आगीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला. दुर्घटनेमध्ये १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

Yash Shirke

  • पुण्यातील हडपसर उंड्री येथे १४ मजली इमारतीत आग लागली.

  • इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील सदनिकेत सिलेंडरचा स्फोट झाला.

  • या दुर्घटनेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आणि ५ जखमी झाले.

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune : पुण्यातील हडपसर उंड्री येथे एका चौदा मजली इमारतीत मोठ्या प्रमाणात आग लागली. इमारतीतील बाराव्या मजल्यावर एका सदनिकेत ही आग लागली होती. या आगीमुळे झालेल्या सिलेंडर स्फोटात एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय ३ नागरिक आणि २ अग्निशमन दलाचे जवान असे एकूण पाचजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

अग्निशमन दलाकडून दिलेल्या निवेदनानुसार, आज (२६ सप्टेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास उंड्री, जगदंब भवन मार्ग येथील मार्वल आयडियल सोसायटीमधील चौदा मजली इमारतीत बाराव्या मजल्यावर विंग एफ क्रमांक १२०१ या सदनिकेत मोठ्या प्रमाणात आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून तातडीने पाच अग्निशमन वाहने, एक बी ए सेट व्हॅन, दोन टँकर एक उंच शिडीचे वाहन आणि शासकीय रुग्णवाहिका क्रमांक १०८ रवाना करण्यात आले होते.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच आगीचे रौद्र रुप व धुर पाहताच होज पाईप वर नेत आग विझवण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला व त्याचवेळी कोणी अडकले आहे का याची खाञी करीत असताना अचानक स्वयंपाक घरातील दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ३ स्थानिक व अग्निशमन दलाचे २ जवान जखमी झाले.

आग विझवत आत घरात प्रवेश केला तेव्हा एका पंधरा वर्षीय मुलाला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाभरात आग इतरत्र पसरु न देता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीमध्ये संपूर्ण सदनिका जळाली आहे. दुर्दैवाने या आगीत त्या पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पनवेल ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधून तरुण पडला

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश, सोलापुरातील राजकारणात उलाथपालथ

Maharashtra Politics: भंडाऱ्यात मोठी राजकीय उलथापालथ, भाजपचे ऑपरेशन लोटस सक्सेस; बड्या नेत्याच्या हाती 'कमळ'

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांच्या कामाची बातमी! ६० लाखांच्या होम लोनवर वाचवता येणार १९ लाख; ही ट्रिक वापरा

Face Care: रात्री मेकअप रिमूव्ह न करता झोपल्यास काय होते?

SCROLL FOR NEXT