MNS : प्ले ग्रुपमधील चिमुरड्याला मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

MNS Ulhasnagar : अडीच वर्षीय चिमुरड्याला मारहाण प्रकरणातील प्ले ग्रुपची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. यानंतर उल्हासनगरमधील मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
MNS Ulhasnagar
MNS Ulhasnagar x
Published On
Summary
  • उल्हासनगरमध्ये एका प्ले ग्रुपमध्ये अडीच वर्षीय मुलाला मारहाण करण्यात आली.

  • यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्ले ग्रुपबाहेर गोंधळ घालत त्याची तोडफोड केली.

  • याप्रकरणी मनसे कार्यकत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय दुधाणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Ulhasnagar : उल्हासनगरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये प्ले ग्रुपमधील शिक्षिकेने एका अडीच वर्षीय चिमुकल्याला मारहाण केली होती. या घटनेनंतर मनसे विद्यार्थी सेनेकडून प्ले ग्रुपची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी मनविसे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव आणि उल्हासनगर शहराध्यक्ष वैभव कुलकर्णा यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उल्हासनगरमधल्या व्हायरल व्हिडीओमध्ये एक शिक्षिका लहान मुलाला मारहाण केल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडीओत कविता शिकवता एक लहान मुलगा टाळ्या वाजवत नव्हता. म्हणून शिक्षिकेने अडीत वर्षांच्या चिमुरड्याला मारले. त्यानंतर मनविसे कार्यकत्यांनी संबंधित प्ले ग्रुपच्या बाहेरील बॅनर फाडून मोडतोड केली होती.

MNS Ulhasnagar
Maharashtra Politics : काँग्रेसला लागोपाठ दुसरा धक्का! मोठ्या नेत्याने सोडली साथ, हातावर बांधणार राष्ट्रवादीचं 'घड्याळ'

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी प्ले ग्रुपबाहेर गोंधळ घातला होता. मोडतोड होत असताना पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना बाजूला केले होते. तोडफोड प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर मनविसे या घटनेनंतर मनविसे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी पदाधिकाऱ्यांसह पोलीस उपायुक्तांची भेट घेत अशा प्ले ग्रुपवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

प्ले ग्रुपवर कारवाईची मागणी करताना दुसऱ्या बाजूला इतर प्ले ग्रुपलाही निवेदन देत शासनाचे नियम पाळा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने काम करु असा इशारा देखील धनंजय गुरव यांनी दिला होता. याप्रकरणी पुन्हा दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही कायमच कार्यरत राहणार असून कुणी चुकीचे काम केल्यास असे कितीही गुन्हे घ्यावे लागले तरी चालतील, अशी प्रतिक्रिया मनविसे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांनी दिली आहे.

MNS Ulhasnagar
Maharashtra Politics : नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडे तक्रार, अजित पवारांच्या नेत्याला अखेर अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com