historical buildings Pune Saam tv
मुंबई/पुणे

Pune Deccan Police Station : क्रिकेट पॅव्हेलियन ते पोलिस ठाणे, पुण्यातील ही १०३ वर्ष जुनी वास्तू काळाच्या पडद्याआड जाणार

historical Pune : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याची इमारत पाडली जाणार आहे. पुण्यातील ही १०३ वर्ष जुनी वास्तू काळाच्या पडद्याआड जाणार आहे.

Akshay Badve

पुणे : ऐतिहासिक वारसा जपणारा शहर म्हणून पुण्याची ओळख सातासमुद्रा पार आहे. जुन्या इमारतींची याती आणि त्याला असलेला एक वेगळा इतिहास या शहराची वेगळी ओळख करून देतो. जुन्या इमारती आणि वाड्यांचं शहर म्हणून पुण्याची ओळख आहे ज्यामध्ये अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे.

त्यातील एक वास्तू म्हणजे पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याची इमारत. तुम्हाला नवल वाटेल हे पोलिस ठाणे एकेकाळी खेळाडूंसाठी क्रिकेट पॅव्हेलियन होतं. होय, पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लब ची निर्मिती १९०६ मध्ये झाली. बंडोपंत नारायण भाजेकर हे तेव्हाचे या संस्थेचे संस्थापक. तो काळ ब्रिटिशांचा होता आणि नुकताच क्रिकेटचा प्रभाव भारतावर पडायला सुरुवात झाली होती. अशातच बंडोपंत नारायण भाजेकर यांचे चुलत भाऊ लक्ष्मण भाजेकर संस्थेचे पहिले जनरल सेक्रेटरी झाले. त्यांच्याच स्मृतिप्रीत्यर्थ १९२२ च्या सुमारास याठिकाणी एक पॅव्हेलियन उभारले गेले ज्याला त्यांचं नाव देण्यात आलं.

भाजेकर पॅव्हेलियन मधून अनेक क्रिकेट चे खेळाडू घडले. खेळाडूंसाठी असलेली चेंजिंग रूम, किट ठेवण्यासाठी जागा, या सगळ्या गोष्टींची सोय तिथे होती. सगळेच खेळाडू या पॅव्हेलियन चा वापर करत असे. काही काळाने या पॅव्हेलियन च्या जागेवर काही दिवस शाळेचे वर्ग होते तर काही दिवसांसाठी याठिकाणी आयुर्वेद रसशाळा सुद्धा होती. याच ठिकाणाहून काही अंतरावर त्यावेळी डेक्कन पोलिस चौकी होती. कालांतराने चुकीचा व्याप आणि विस्तार वाढला, पुन्हा पॅव्हेलियन च्या जागेवर १९५५ मध्ये डेक्कन पोलिस ठाणे कार्यरत झालं. आजपर्यंत हे पोलिस ठाणे याच इमारतीत आहे.

या वास्तूने शहरातील अनेक गोष्टी पाहिल्या ज्यामध्ये सगळ्यात भीषण असा मानला जाणारा पूर. पुण्यात १९६१ मध्ये पानशेत धरण फुटून पूर आला ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. या पोलिस ठाण्याच्या छपरापर्यंत त्याचं पाणी लागलं होतं आणि असं म्हणतात त्याकाळी असलेले अंमलदार कागदपत्र भिजू नये म्हणून याच इमारतीच्या वर जाऊन बसले होते. सध्या इमारतीत असलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बाहेर ही पुरुरेषा आखण्यात आली आहे ज्यावर तारीख आणि वर्ष नमूद आहे.

पुण्यातील ब्रिटिशकालीन इमारतीत वसलेलं डेक्कन पोलिस ठाणे आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे. पुणे शहरातील डेक्कन पोलिस ठाणे कार्यरत असलेली, ऐतिहासिक आणि ब्रिटिशकालीन भाजेकर पॅव्हेलियन ची इमारत आता नव्याने उभारली जाणारे. डेक्कन जिमखाना क्लबने या जागेचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिस आयुक्तांना पाठवला आहे.

या इमारतीत जुन्या काळातील वाड्यांना असलेले कडी कोयंडे अजूनही आहेत. आजही याठिकाणी भूमिगत खोल्या आहेत ज्या एकेकाळी लॉकअप म्हणून वापरल्या जायच्या. सध्या तिथे कागदपत्र ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. एकेकाळी अनेक खेळाडू पाहिलेल्या या वास्तूने अनेक थरारक गुन्हेगारी सुद्धा पाहिली असं असताना सुद्धा या वास्तूच्या चिरा अजूनही ढासळलेल्या नाहीत. काही दिवसातच ही वास्तू नव्याने उभी राहील पण आठवणी आजही अनेकांच्या मनात राहील हे नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सूरज चव्हाणांना २४ तासांच्या आत जामीन मंजूर

मराठी असल्यानेच नाना पाटेकरवर कारवाई नाही, मंत्र्यांचाही सपोर्ट, तनुश्रीचे गंभीर आरोप

Amruta Khanvilkar: सातासमुद्रापार अमेरिकेत थिरकली चंद्रा, 'या' लोकप्रिय गाण्यावर केला डान्स

Raksha Bandhan 2025: सातासमुद्रापार परदेशात भावाला ऑनलाइन पद्धतीने पाठवा राखी; पर्याय वाचा

Amravati : उड्डाणपुलाचे काम रखडले; प्रधान सचिवांना १ लाख रुपयांचा दंड, कोर्टाकडून ३१ डिसेंबरचा अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT