Maharashtra Politics : ठाकरे गटात मोठा राडा; शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुखांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?

Nanded Politics : ठाकरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात आणि माजी जिल्हाप्रमुख बंडू खेडकर यांच्यामध्ये राडा झाला आहे. बबन थोरात पैसे घेऊन पदे वाटतात, माजी जिल्हाप्रमुख बंडू खेडकर यांचे बबन थोरातांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
uddhav thackeray group
nanded Saam tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड : आगामी निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय पक्षांनी मोर्चेंबाधणी करायला सुरुवात केली आहे. एकीकडे काही पक्षात नेत्यांचे पक्षप्रवेश सुरु आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाचा पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नांदेडमध्ये शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुखांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यावेळी नांदेडची शिवसेना बबन थोरातांनी विकली, असा गंभीर आरोप देखील माजी जिल्हाप्रमुख बंडू खेडकर यांनी केला आहे. नांदेडमधील घटनेने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

uddhav thackeray group
Satara Shocking : तीच मुलगी अन् तोच मुलगा, याआधीही हल्ल्याचा प्रयत्न; साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला, धक्कादायक VIDEO

नांदेडच्या ठाकरे शिवसेनेमध्ये आज शासकीय विश्रामगृह येथे जबरदस्त राडा झाल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे शिवसेनेचा आज नांदेड शहरामध्ये मेळावा आहे. या मेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात हे नांदेडमध्ये आले होते. परंतु मेळाव्या आधीच ठाकरे शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुख बंडू खेडकर आणि संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्यामध्ये जबरदस्त धक्काबुक्की झाल्याची कबुली खुद्द माजी जिल्हाप्रमुख बंडू खेडकर यांनी दिली.

uddhav thackeray group
Bangladesh Plane Crash : अहमदाबादची पुनरावृत्ती; टेकऑफनंतर काही क्षणात विमान शाळेवर कोसळलं, परिसरातील धक्कादायक VIDEO समोर

'संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी नांदेडची शिवसेना विकली आहे. पैसे घेऊन पदे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी माजी जिल्हाप्रमुख बंडू खेडकर यांनी बबन थोरात यांच्यावर केले. बबन थोरात जेव्हा जेव्हा नांदेडमध्ये येतील, त्यांना विरोध करण्यात येईल. पक्षातील वरिष्ठ दखल घेत नसल्याने नांदेडमध्ये हाणामारीपर्यंत प्रकार जात आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये देखील नांदेड उत्तरचे तिकीट बबन थोरात यांनी विकल्याचा आरोप बंडू खेडकर यांनी केला आहे.

uddhav thackeray group
Kalyan News : अर्वाच्च शिवीगाळ अन् केस उपटून आपटलं, नंतर पोटात लाथाबुक्क्या; परप्रांतीयाकडून मराठी तरुणीला बेदम मारहाण, VIDEO

दरम्यान, पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते,कार्यकर्ते बबन थोरात यांच्या वृत्तीमुळे पक्षातून बाहेर जात आहेत. नांदेडमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना टीकवायची असेल तर अशा गद्दारांना नांदेडमध्ये येऊ देणार नसल्याची भूमिका आमची राहणार असल्याचा इशारा ठाकरे सेनेचे माजी जिल्हाप्रमुख बंडू खेडकर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com