Kalyan News : अर्वाच्च शिवीगाळ अन् केस उपटून आपटलं, नंतर पोटात लाथाबुक्क्या; परप्रांतीयाकडून मराठी तरुणीला बेदम मारहाण, VIDEO

Kalyan News update : परप्रांतीय तरुणाने मराठी तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या नांदिवलीमध्ये ही घटना घडली आहे.
Kalyan News
Kalyan News update Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

kalyan hospital Rada : कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी व्यक्तीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या नांदिवलीमधील खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मानपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मारहाण प्रकरणाचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. या घटनेमुळे मराठीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या नांदिवली परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याणमध्ये खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टरकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा, तरुणी इतके बोलली. मात्र, त्यानंतर परप्रांतीय तरुणाने मराठी तरुणीला बेदम मारहाण केली आहे.

Kalyan News
Devendra Fadnavis : मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खुलासा केलाय, पण...; रमी प्रकरणावर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

गोपाल झा नावाच्या परप्रांतीय तरुणाने ही मारहाण केली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माराहणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मानपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण डॉक्टरची वाट पाहत होते. मात्र, त्यावेळी डॉक्टरकडे एमआर बसले होते. त्यामुळे रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीने गोपाल झा या नावाच्या तरुणाला थांबण्यास सांगितलं. मात्र, या परप्रांतीय तरुणाने थेट मराठी तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या तरुणाने तरुणीच्या पोटात लाथाबुक्या मारल्या. त्यानंतर केसाला धरून उचलून आपटलं. तरुणीला मारहाण झाल्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. इतर रुग्ण घाबरून गेले. काहींनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.

Kalyan News
Affordable Living : अवघ्या १०० रुपयांमध्ये मिळतोय अलिशान बंगला; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

नांदिवलीतील प्रकारावर ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे म्हणाले की, 'घडत असलेल्या घटना दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राचे वातावरण दूषित झालं आहे. एखाद्या महिलेला मारहाण करणाऱ्या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी गुन्हे दाखल करत तरुणाला तातडीने जेलमध्ये डांबले पाहिजे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com