पुण्यात मनोरुग्णाची 35 फूट उंच होर्डिंगवरुन उडी सागर आव्हाड
मुंबई/पुणे

पुण्यात मनोरुग्णाची 35 फूट उंच होर्डिंगवरुन उडी

यामध्ये त्याला गंभीर मुका मार लागला

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे - पुणे रेल्वे स्टेशन Pune Railway Station परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे रेल्वे व बस स्थानकादरम्यान असलेल्या ३५ फुटी जाहिरात फलकावरुन एका मनोरुग्णाने खाली उडी मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात हा मनोरुग्णा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाने या मनोरुग्णाला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र या झटापटीत या मनोरुग्णाने ३५ फुटी जाहिरात फलकावरुन उडी मारली.

हे देखील पहा -

पुणे स्टेशन परिसरात एक वेडसर व्यक्ती जाहिरातीच्या बोर्डवर चढली होती. हा बोर्ड ३५ फुट उंच होता. हा मनोरुग्ण व्यक्ती तेथून उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. या घटनेची माहिती मिळताच तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती दिली.

या ठिकाणी तातडीने कसबा फायर स्टेशनचे Kasba Fire Station कर्मचारी दाखल झाले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी साईन बोर्डवर चढून या मनोरुग्णाला वाचवण्याचे प्रयत्न केले. तसेच खाली जाळी देखील धरून ठेवण्यात आली होती. मात्र त्यानेफायर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना चकवा देत थेट रस्त्यावर उडी मारली. यामध्ये त्याला गंभीर मुका मार लागला असून त्याला ससून रुग्णलयात Sasoon Hospital उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT