Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Dahihandi 2025 Tragedy: दहीहंडीच्या उत्सवादरम्यान २ गोविंदांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ९५ जण जखमी झाले. जखमी गोविंदांना कोणत्या रुग्णालयांमध्ये दाखल केले याची यादी पहा.
Dahihandi 2025 Tragedy
Dahihandi 2025 tragedy: Two Govindas dead, 95 injured across Maharashtra celebrationssaamtv
Published On
Summary
  • दहीहंडी उत्सवात २ गोविंदांचा मृत्यू झाला

  • राज्यभरात तब्बल ९५ गोविंदे जखमी झाले

  • न्यायालय व सरकारचे आदेश असूनही सुरक्षेची खबरदारी नाही

  • रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू

राज्यभर दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला, पण दोन गोविंदांच्या मृत्यूमुळे दरम्यान या उत्सवाला गालबोट लागलं आहे. तर ९५ गोविंदा जखमी झाले आहेत. दरम्यान दहीहंडीत शेवटच्या थरावर जाणाऱ्या बाल गोविंदाची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचं चित्र यावेळी दिसून आला. त्यामुळे न्यायालयाचे आदेश आणि त्यांनतर सरकारनं काढलेले जीआर काढूनही सुरक्षेबाबत कोणतीच खबरदारी घेण्यात आली नाहीये. त्यामुळेच दहीहंडी उत्सवात २ गोविंदाला आपला जीव गमवावा लागलाय. गोविंदाच्या मृत्यूने उत्सवाला गालबोट लागलाय.

Dahihandi 2025 Tragedy
Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

आधी मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर गावदेवी गोविंदा पथकातील गोविंदाचा मृत्यू झालाय. रोहन वाळवी, असे गोविंदाचे नाव असल्याचं सांगितले जात आहे. तर मानखुर्दमध्ये ३२ वर्षीय जगमोहन शिवकिरण चौधरी या तरुणाचा मृत्यू झाला होता. हंडीसाठी दोरी बांधताना तोल गेला. त्यानंतर खाली कोसळून जगमोहनचा मृत्यू झाला.

Dahihandi 2025 Tragedy
Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

जाणून घ्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण आहेत दाखल

जखमी गोविंदांच्या विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांमधील माहिती रेकॉर्ड रात्री ९ वाजेपर्यंत:

सीटी रुग्णालये: जखमी ३०; उपचार सुरू ११ (जी टी रुग्णालयात १ गंभीर - नाव श्रेयस चाळके, २३ वर्ष), १९ जणांना डिस्चार्ज

ईएस रुग्णालये - जखमी ३१; उपचार सुरू ०५, २६ जणांना घरी सोडण्यात आले

डब्ल्यूएस रुग्णालये - जखमी ३४; उपचार सुरू ०३ (बीडीबीए, कांदिवली रुग्णालयात १ गंभीर; नाव आर्यन यादव, ९ वर्षे) ३१ जणांना डिस्चार्ज

एकूण: जखमी ९५; उपचाराधीन १९ (२ गंभीर); ७६ जणांना डिस्चार्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com