Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Konkan Railway RORO Service Registration: कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेने गणेशोत्सव २०२५ साठी रोरो सेवा नोंदणीची अंतिम मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. या सुविधेमुळे मुंबई-कोकण भाविकांचा प्रवास सुलभ होईल.
Konkan Railway RORO Service Registration
Konkan Railway extends RORO service registration deadline till August 20 for Ganeshotsav devotees.saamtv
Published On
Summary
  • गणेशोत्सवासाठी मध्य आणि कोकण रेल्वेची रो-रो सेवा उपलब्ध

  • नोंदणीची अंतिम मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढवली

  • भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

  • मुंबई-कोकण प्रवासासाठी मोठी सोय निर्माण

मुंबईत गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने भाविकांसाठी रो रो सेवा सुरू केली. ४६ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केल्यानंतर आता मध्य रेल्वेने रो-रो बाबत मोठी घोषणा केली आहे. रोल-ऑन/रोल-ऑफ (RORO) सेवांसाठी नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

आधी नोंदणी करण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्टपर्यंत होती. नोंदणीसाठी मुदत वाढवण्यासाठी ग्राहकांनी विनंती केली होती. ग्राहकांची विनंती लक्षात घेत कोकण रेल्वेने नोंदणीची अंतिम मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.रोरो सेवेमुळे कोकण मार्गावरील प्रमुख ठिकाणी वाहनांची सुरक्षित आणि त्रासमुक्त वाहतुक होते. ज्यामुळे रस्त्यावरील कोंडी कमी होते. इच्छुक ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि त्यांची नोंदणी प्रक्रिया लवकर पूर्ण करावी अशी विनंती रेल्वेने केली आहे. दरम्यान रेल्वेच्या सेवेचा लाभ कसा घ्यायचा याची अतिरिक्त माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे.

Konkan Railway RORO Service Registration
Sindhudurg : कणकवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान हाणामारी! | VIDEO

तसेच सविस्तर अटी आणि शर्ती आणि नोंदणी प्रक्रियेसाठी ग्राहक www.konkanrailway.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. दरम्यान रोरो सेवेचा उद्देश चाकरमान्यांचा प्रवास सुलभ करणे आहे. कोलाड ते वेणा आणि नांदगाव रोडदरम्यान ही सेवा २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. एक दिवसाआड ‘रो रो’ फेरी धावणार आहे. एका फेरीत एकाच वेळी ४० कार वाहून नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Konkan Railway RORO Service Registration
वाहन आणि लायसन्ससाठी आधार अन् मोबाईल अनिवार्य; जाणून घ्या लिंक करण्याची प्रोसेस

कोकण रेल्वेने रो-रो कार वाहतूक सेवेसाठी मालवाहतूक शुल्क आणि वेळेतही सुधारणा केली आहे. आधी बुकिंगची अंतिम तारीख १३ ऑगस्टवरून १८ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती, त्यानंतर आता ही मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलीय. दरम्यान कोकण रेल्वेने रो-रो कार वाहतूक सेवेसाठी मालवाहतूक शुल्क आणि वेळेतही सुधारणा केली आहे. आधी बुकिंगची अंतिम तारीख १३ ऑगस्टवरून १८ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती, त्यानंतर आता ही मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com