Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Dhanishta astrology : धनिष्ठा नक्षत्राचे लोक आशावादी, मेहनती व प्रतिज्ञावीर असतात. त्यांचा व्यवसाय पोलिस, लष्करी अधिकारी, करसंबंधित किंवा खाणकामाशी जोडलेला असतो. आरोग्याच्या बाबतीत गुडघेदुखी, फ्रॅक्चर व रक्तदाबाची समस्या दिसते.
Dhanishta Nakshatra
Dhanishta Nakshatragoogle
Published On

धनिष्ठा नक्षत्र : बोलेल तेच करून दाखवणारे प्रतिज्ञावीर धनिष्ठा नक्षत्र. मंगळाच्या अमलाखाली येणारे हे नक्षत्र. दोन चरण मकरे मध्ये तर दोन चरण कुंभ राशीत येतात. स्वभाव अत्यंत आशावादी, साहसी, कलाप्रेमी, कष्टाळू, मेहनती, कामाची आवड असणारे, दीर्घोद्योगी, हाती असलेले काम तडीस नेणारे, प्रतिज्ञा करणारे आणि ती तडीस नेणारे. ज्योतिष, गणिताची आवड, संशोधकवृती, संतापी, आरे ला कारे करणार.

कार्य तत्पर, चंचल, स्पष्ट आणि खणखणीत आवाज, उच्च अभिलाषी, नेतृत्व करणारे, काही वेळेला हिंसक वृत्ती दिसून येते. पण नियंत्रणात लवकर येतात. धनिष्ठा नक्षत्राचे लोक स्वतःच्या हिमतीवर कर्तव्य श्रेष्ठ पदाला पोहोचतात. सेवाभावही चांगला असतो.

नोकरी व्यवसाय

या व्यक्ती शिकारी व्यवसाय चांगला करू शकतात. मातीशी संबंधित व्यवसाय, संपत्ती कर, वसुली खाते, इन्कम टॅक्स, अस्थिरोग तज्ञ, सिमेंट व्यवसाय, पशुपालन व्यवसाय, पोलीस, लष्करी अधिकारी, कोळसा, विस्फोटक व्यावसायिक, कोळसा खाण मालक, नोकरीमध्ये सुद्धा पडीक जागेत व्यवसायात उन्नतीच मिळवतात. भूकंप क्षेत्रात नोकरी, भांड्याशी संबंधित व्यवसाय, तेल खाणीशी संबंधित, फाउंड्री व्यवसाय, मृत्यूकर विभाग, अंत्यविधीची सामग्रीचे व्यवसाय, स्मशानाशी संबंधित, वादविवादात निर्णय घेणारे, बटाटा आणि जूट व्यापारी, हवामान शास्त्रज्ञ, लोहार आणि भांडी व्यवसाय असू शकतात.

रोग आजाराचा विचार करता

या नक्षत्रावर गुडघे आणि त्यावरचा भाग, मधला भाग येतो. पायाचे हाड मोडणे, फ्रॅक्चर होणे, बीपी, गुडघे बदलण्याचा ऑपरेशन, भाजणे, कापणे, त्वचारोग, मुखरोग, शिरा सरकणे, अपघात, डांग्या खोकला असे आजार होऊ शकतात.

Dhanishta Nakshatra
Aadhar Card : खुशखबर! आता आधार अ‍ॅपवर क्षणात नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com