Sakshi Sunil Jadhav
बऱ्याच जणांना आधार कार्डात काही बदल करायचे असतात. त्यासाठी पोस्ट ऑफीसमध्ये लांबच्या लांब रांगा लावाव्या लागतात.
तुम्ही आता UIDAI च्या लॉंच होणाऱ्या ई-अॅपवरुन सर्व माहिती घरीच अपडेट करु शकता.
तुम्ही ई-अॅपवरुन तुमचा मोबाईल नंबर, नाव, पत्ता, जन्मतारिख यांसारखी माहिती अपडेट करु शकता.
तुम्हाला ई-अॅपचा वापर करण्यासाठी चांगल्या स्मार्ट फोनची गरज आहे.
तुम्ही या अॅपमध्ये फेस आयडी, एआय व्हेरिफिकेशन आणि क्यूआर-कोड असलेल्या डिजिटल आयडेंटिफिकेशन सिस्टमचा वापर करु शकता.
UIDAच्या सीईओंच्या मते, तुम्ही या अॅपच्या साहाय्याने आधार कार्ड अॅक्सेस मिळवून फसवणुकीच्या धोक्यापासून वाचू शकता.
आधारच्या अॅपच्या साहाय्याने तुम्ही डिजिटल किंवा मास्क केलेले आधार शेअर करु शकता. यामुळे फोटोकॉपीची गरज लागणार नाही.
पासवर्ड किंवा ओटीपीशिवाय तुम्ही तुमच्या चेहऱ्याने अॅप लॉगिन करु शकता.