एनसीसी करणार वन्यजीवांचा अभ्यास, दादा पाटील कॉलेजचा पुढाकार

कर्जत एनसीसी विभागाचे छात्र आणि मेजर डॉ. संजय चौधरी.
कर्जत एनसीसी विभागाचे छात्र आणि मेजर डॉ. संजय चौधरी.

अहमदनगर ः वन्य जीवनाबाबत छात्र सैनिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, त्याचे संवर्धन-संरक्षणाबाबत कर्तव्याची जाणीव निर्माण करण्यासंदर्भात एनसीसीने निर्णय घेतला आहे. कर्नल जीवन झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर डॉ. संजय चौधरी, रेहेकुरी अभयारण्याचे अधिकारी सागर केदार यांच्या सहकार्यातून जनजागृती अभियान राबविले जाणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवड, वन्यजीवाविषयी माहिती जाणून घेणे, स्थानिक वन जमाती, प्रचार फेरी, अनुभव कथन, वन्यजीवाविषयी चित्रपट, माहितीपट विशेष तज्ज्ञांची संभाषणे, प्लास्टिक निर्मूलन, वाटर फॉर ॲनिमल यासारख्या विषयावर जनजागृती करणार आहे. NCC students will study wildlife

कर्जत एनसीसी विभागाचे छात्र आणि मेजर डॉ. संजय चौधरी.
विखे पाटलांच्या तालुक्यात दुपटीने वाढले बाधित! लसही कोणी घेईना

नुकताच वन्यजीव सुरक्षासंदर्भात एनसीसी विभाग व रेहेकुरी फॉरेस्ट विभाग यांचा समन्वय करार झाला आहे. छात्र सैनिकांना फॉरेस्ट अधिकारी सागर केदार यांनी सद्यस्थितीविषयी छात्रांना माहिती दिली.

या विभागाला कर्नल जीवन झेंडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण परिसराचे निरीक्षण केले. या विभागासाठी छात्र सैनिकांना जनजागृती करण्यासंदर्भात आदेश दिले होते. हे अभयारण्य काळवीट, माळढोकसाठी जगप्रसिद्ध आहे. या समन्वय करारासंदर्भात मेजर डॉ. संजय चौधरी यांचे कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली, प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, आमदार रोहित पवार, कॉलेज विकास समितीचे चेअरमन राजेंद्र फाळके, अंबादास पिसाळ, बप्पासाहेब धांडे, राजेंद्र निंबाळकर यांनी अभिनंदन केले.NCC students will study wildlife

22 सप्टेंबर 2019 रोजी मेजर डॉ. संजय चौधरी यांनी सर्व छात्र सैनिकांनी समवेत अभयारण्याला भेट देऊन तेथील प्राथमिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com