विखे पाटलांच्या तालुक्यात दुपटीने वाढले बाधित! लसही कोणी घेईना

कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरसSaam Tv

अहमदनगर ः राहाता तालुक्यात मागील महिन्याच्या तुलनेत कोविड रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली. मोठ्या लोकसंख्येच्या लोणी बुद्रुक (६८), राहाता (४२), वाकडी (२६), कोल्हार बुद्रुक (२२) व अस्तगाव (२१) या गावांत रुग्णवाढीचा वेग अधिक आहे. त्याच वेळी, पुरेसा साठा उपलब्ध असतानाही लसीकरण केंद्रे ओस पडत असून, लस घेण्याबाबतचा पूर्वीचा उत्साह मावळत चालला आहे. हा मतदारसंघ भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आहे.

ही बाब लक्षात घेऊन तहसीलदार कुंदन हिरे यांनी आज लसीकरणाला वेग देण्याचे नियोजन केले. रुग्णसंख्यावाढीचा वेग अधिक असलेल्या गावांत एकापेक्षा अधिक लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. गावोगावी लसीकरणाला वेग देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येत आहेत. Corona patients grew in Vikhe Patil's constituency abn79

कोरोना व्हायरस
कोरोनाचा कहर, पारनेरमध्ये १२ गावांत लॉकडाउन

हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ते दहापर्यंत रुग्णसंख्या असलेल्या गावांची संख्या पस्तीसवर जाऊन पोचली आहे. गोगलगाव, केलवड बुद्रुक, शिर्डी, लोणी खुर्द, बाभळेश्वर बुद्रुक व सावळीविहीर बुद्रुक या गावांत तेरा ते एकोणावीसपर्यंत रुग्णसंख्या आहे. मोरवाडी, चोळकेवाडी, तरकसवाडी, नांदुर्खी खुर्द, केलवड खुर्द, आडगाव खुर्द, तिसगाववाडी, सावळीविहीर खुर्द, रुई, पिंपळवाडी, धनगरवाडी, येलमवाडी व नांदूर खुर्द या गावांत सध्या एकही रुग्ण नसला, तरी शेजारी रुग्णसंख्या अधिक असलेल्या बाजारपेठेच्या गावांसोबत या गावांचा नित्याचा संपर्क असल्याने, संसर्ग फैलावाचा धोका वाढला आहे. लोकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. Corona patients grew in Vikhe Patil's constituency abn79

तालुक्यात सुमारे सव्वादोन लाख लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी एक लाख २० हजार लोकांनी लसीची पहिली, तर ५३ हजार लोकांनी दुसरी मात्रा घेतली. तुलनेत ही संख्या समाधानकारक असली, तरी लसीकरणाचा वेग मंदावल्याने चिंता वाढली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com