
रविवार,१७ ऑगस्ट २०२५,श्रावण कृष्णपक्ष.
तिथी-नवमी १९|२५
रास- वृषभ
नक्षत्र-रोहिणी २७|१८
योग-व्याघात
करण-तैतिल
दिनविशेष-चांगला दिवस
मेष - आज व्यवहाराच्या बाबतीत कुठेही साक्षीदार राहू नका. आपले कोण परके कोण ओळखून आज काम करणे जास्त बरे राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याने पुढे जाल. धनयोगाला दिवस चांगला आहे.
वृषभ - मुळातच रसिक असणारी आपली रास काही गोष्टी खरेदी, मनोरंजन, स्वतःला आनंद वाटेल अशा गोष्टींच्याकडे आज कल राहील. भावनिकतेला विशेष प्राधान्य आज राहणार नाही. मनमौजी दिवस जगाल.
मिथुन - ध्यानीमनी नसताना आपल्याकडून इतरांना वेगळीच वागणूक दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचे बालंट किंवा दोष आपल्याकडे येण्याची दाट शक्यता आहे. नको ते धाडस करणे आज टाळा. बंधन योग येतील.
कर्क - मैत्रीमध्ये परिपूर्णता येतील. कदाचित स्त्री सखी कडून विशेष फायदा होण्याची दाट शक्यता आहे. नवनवीन गोष्टी अवगत करण्यासाठी प्रयत्न कराल. परदेशी वार्तालाप होईल.
सिंह - ताठ मानेने जगण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. आपले वर्चस्व इतरांवर प्रस्थापित कराल. मग तुमचे कनिष्ठ असो अथवा वरिष्ठ. स्वतःच्या कामावरचा दाट विश्वास तुम्हाला प्रगतीपथावर घेऊन जाईल. दिवस चांगला आहे.
कन्या - विष्णू उपासना आज करावी. उत्तम फलित मिळणार आहेत. तीर्थक्षेत्रि भेटी होतील. कामाच्या ठिकाणी सुधारणा होतील. केलेल्या कामाचे सार्थक झाले अशी आज भावना होईल. दिवस उत्तम आहे.
तूळ- सहज सुलभ गोष्टी करण्याकडे आज कल ठेवा. काळेधन, लाच लुचपत, भ्रष्टाचार यापासून आज स्वतःला जपलेले बरे. कारण नसताना कुठेही अडकण्याची आवश्यकता आहे. अति धनाचा लोभ नकोच.
वृश्चिक - न बोलता शांतपणे कामे करणारी आपली रास. काही गोष्टी जुन्या ज्या आपल्याला त्रास देण्यासाठी कोणी केल्या असतील तर आज त्यांना पुरून उराल. कोर्टाच्या कामांमध्ये सहज यश मिळेल. कदाचित धाकटपटाशाने आणि दमदाटीने कामे सहज होतील.
धनु - गुढघेशी निगडित, पायाशी निगडित आजार आज जपणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट करत असताना योग्य निर्णयावर गेलात तर बरे राहील. द्विधा मनस्थिती टाळा. शत्रुभय संभवते आहे.
मकर - शिव उपासना करावी. आपली सुजनशीलता आज वाढती राहील. अनेक गोष्टी मनामध्ये असणाऱ्या उशिरा का होईना पण आज मार्गी लागतील. शेअर्समधील गुंतवणूक फलदायी ठरेल.दिवस चांगला आहे.
कुंभ - प्रॉपर्टीशी निगडित व्यवहार होतील. घेतलेले निर्णय मधून अजून नवीन व्यवहार वाढण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात वृद्धीच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. शेतीवाडी मधून पैसा मिळेल.
मीन - सोबत असणाऱ्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी लागेल. शेजाऱ्यांचे विशेष सहकार्य मिळेल. प्रेमामधून लाभ होतील. यशावर लक्ष केंद्रित केल्यास भाग्य दूर नाही हे लक्षात ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.