Pratap Sarnaik Saam Tv
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर प्रताप सरनाईक यांचे 'ते' पत्र व्हायरल

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह बंडखोरी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या (Election) दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्याचे दिसत आहे. काल (मंगळवार) शिवसेनेचे नाराज नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना आमदारांच्या एका गटासह सुरत गाठले होते. त्यांच्यासोबत ३३ आमदार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणील आल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे एक जुने पत्र सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रताप सरनाईक यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे समोर आले आहे. (Eknath Shinde latest News)

काल रात्रीपासून हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिनसेनेच्या ३३ आमदारांनी बंड केले आहे. या आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. शिंदे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला होता, पण ठाकरे यांनी हा प्रस्ताव नाकारला असल्याचे बोलले जात आहे.

'गेल्या दिड वर्षात आपण मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले आहे. कोरोना काळात आपण केलेल्या कामाचे कौतुक अनेकांनी केले आहे, पण महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. राष्ट्रवादीचे नेते सेनेच्या कार्यकर्त्यांना फोडण्यात येत आहे, तसेच ईडीपासून वाचण्यासाठी सोबत असणाऱ्या पक्षातील नेते केंद्रीय नेतृत्वासोबत संधान साधत आहेत. तर आपल्या नेत्यांना ईडीकडून त्रास दिला जात आहे, असं या पत्रात म्हटले आहे.

'पुढच्या वर्षी मुंबई, ठाणेव अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी, युतीच्या नेत्यांसोबत आपले संबंध चांगले आहेत. ते संबंध तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल, तर त्याचा फायदा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला (Shivsena) भविष्यात होईल अस या पत्रात प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

Pratap Sarnaik
Pratap Sarnaik

गेल्या दोन दिवसापासून हे पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रात ज्या मागण्या गेल्या वर्षी प्रताप सरनाईक यांनी केली होती, त्याच मागण्या आता एकनाथ शिंदे यांनी केल्या असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajinikanth-Coolie : रजनीकांतच्या चित्रपटासाठी सगळी कंपनीच बंद, कर्मचाऱ्यांना दिली मोफत तिकिटे

क्रिकेटविश्वात खळबळ! भारताच्या माजी क्रिकेटरला ईडीची नोटीस, आज चौकशी, नेमकं प्रकरण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी कोण? सासू, सून की जाऊबाई; लाडकी बहीण योजनेच्या लाभावरुन सासू-सुनांमध्ये महाभारत

ICICI नंतर आणखी एका बँकेचा ग्राहकांना मोठा धक्का, मिनिमम बॅलेंसचं लिमिट अडीचपट वाढवलं

Accident : भाविकांवर काळाचा घाला, पिकअपचा भयंकर अपघात, १० जणांचा मृत्यू, ७ मुलांचा समावेश

SCROLL FOR NEXT