संध्याकाळी ५ पर्यंत मुंबईत या, अन्यथा...; शिवसेनेकडून बंडखोरांना शेवटचा इशारा

शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.
Uddhav Thackeray News, Maharashtra Political Crisis
Uddhav Thackeray News, Maharashtra Political CrisisSaam Tv
Published On

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून (Shivsena) या बंडखोर आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशातच, शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांना शेवटचा इशारा दिला आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईत या अन्यथा कारवाई अटळ असा इशारा या आमदारांना देण्यात आला आहे. यासंदर्भातील परिपत्रक शिवसेनेकडून संबधित आमदारांना पाठवण्यात आल्याची माहिती आहे. (Maharashtra Political Crisis News)

Uddhav Thackeray News, Maharashtra Political Crisis
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण

मुंबईतील वर्षा बंगल्यावर आज म्हणजेच बुधवारी संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उपस्थित राहावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवले आहे. या पत्रात बुधवारी दुपारी पाच वाजता शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत.

Uddhav Thackeray News, Maharashtra Political Crisis
मला हार्ट अॅटॅक आलाच नाही, घात करण्याचा डाव; नितीन देशमुख म्हणाले, मी उद्धव ठाकरेंसोबत!

राज्यात पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी वर्षा बंगल्यावर आज सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सर्वांची उपस्थिती आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे.

या बैठकीला उपस्थित न राहिल्यास स्वेच्छेने शिवसेना पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे, असे ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात असलेल्या तरतुदीनुसार तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा शिवेसनेच्या बंडखोर आमदारांना देण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com