Kalyan Dombivli News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News : महायुतीत बॅनर युद्धाचा भडका! "कोण आहे विकासाचे स्पीडब्रेकर?" भाजपची शिंदे गटावर खोचक टीका

Kalyan Dombivli News : केडीएमसी निवडणुकीपूर्वी ठाकुर्लीत भाजप आणि शिंदे सेना आमनेसामने आले असून, उन्नत मार्गाच्या रखडलेल्या कामावरून बॅनरबाजी युद्ध छेडले गेले आहे. महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येत असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

Alisha Khedekar

  • ठाकुर्लीत उन्नत मार्गाच्या कामावरून महायुतीतील अंतर्गत तणाव वाढला

  • शिंदे सेना आणि भाजपने बॅनरबाजी करत एकमेकांवर आरोप

  • नागरिकांनी विकासकामे विलंबित का? असा सवाल उपस्थित केला

  • निवडणूक जवळ आल्याने राजकीय संघर्षाला उधाण

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

आगामी केडीएमसीच्या निवडणुकीपूर्वी भाजप व शिंदे सेना यांच्यात फोडाफोडीवरून मोठे राजकारण घडले होते. त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र भर झाली होती. भाजपने जेव्हा शिवसेनेचे तीन नगरसेवक फोडल्या नंतर शिंदे सेनेकडून बॅनरबाजी करत त्यावर विकासाच्या नावावर टीकास्त्र सोडण्यात आले होते.

ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात "आमचं काम बोलतंय, फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देत खासदार श्रीकांत शिंदे याचा विकासाकडे कल" शिवसेनेनं अशा आशयाची बॅनर बाजी करत, नाव न घेता रवींद्र चव्हाण व भाजपला टोला लगावला होता. याला प्रतिउत्तर म्हणून भाजपने देखील बॅनरबाजी केली.

"कल्याण-डोंबिवलीच्या विकासाचे स्पीडब्रेकर कोण? जनतेला उत्तर द्या, तुमच्या विकासाच्या योद्ध्‌याने २०१४ पासून आजपर्यंत हा उन्नत मार्ग का पूर्ण केला नाही? आधी व्यवस्थित माहिती घ्यावी नंतर बड्या बाता मारा. आधी या प्रश्नाचे उत्तर द्या मगच बॅनरबाजी करा." अशाप्रकारच्या आशयाची बॅनर बाजी करत भाजपने थेट प्रत्युत्तर देत शिंदेंच्या शिवसेनेला बॅनरच्या माध्यमातून खोचक सवाल केला आहे.

गेले अनेक वर्षापासून रखडलेले उन्नत मार्गासाठी MMRDA ने ३६ कोटींची निविदा जाहीर केल्यानंतर हा राजकीय संघर्ष सुरू झाला. आणि त्याआधी फोडाफोडीवरून युतीतील अंतर्गत वाद चवाट्यावर आले होते. डोंबिवलीतील ठाकुर्ली रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना शिंदे गटाकडून दोन दिवसापूर्वी बॅनरबाजी करत भाजपवर निशाणा साधला होता, तर आता डोंबिवलीच्या ठाकुर्ली चोले गाव परिसरात भाजपकडून बॅनर बाजी करत शिंदे गटाला प्रतिउत्तर देण्यात आले आहे. या प्रकरणानंतर महायुतीमध्ये अंतर्गत वातावरण बिघडले आहे का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT