Maharashtra Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : शिंदेंचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच दादांनी पळवला, भोरमध्ये महायुतीत संघर्ष टोकाला

Maharashtra Local Body Election : भोर नगरपालिकेतील निवडणुकीत महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचा प्रमुख उमेदवार नितीन सोनवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजप आणि राष्ट्रवादीची थेट लढत ठरणार असून महायुतीतील अंतर्गत संघर्ष तीव्र होत आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

शिंदे गटाचा प्रमुख उमेदवार नितीन सोनवले राष्ट्रवादीत प्रवेश

शिवसेनेची भोरमधील समीकरणे पूर्णत: बदलली

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत निश्चित झाली

महायुतीत अंतर्गत संघर्ष तीव्र झाल्याचे स्पष्ट संकेत

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

राज्यातील महायुती जरी सत्तेत एकत्र असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तुफान खटके उडताना दिसत आहे. स्थानिक स्तरावर तिन्ही पक्षांनी एकमेकांसमोर उभे ठाकत थेट लढत होतं आहे. इतकंच नाही तिन्ही पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ लागल्याच चित्र संबंध राज्यात पहायला मिळत आहे. यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार वाद सुरु असताना आता पुणे जिल्ह्यात अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांचा थेट नागराध्यक्ष पदाचा उमेदवारच फोडल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये यंदाची लढत विशेष गाजत आहे. पूर्वी येथे भाजपची ताकद ही मर्यादित होती. मात्र माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या तालुक्यात भाजपचे वजन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक वर्षे संग्राम थोपटे यांना स्थानिक पातळीवर थेट आव्हान देत आपली ताकद टिकवून ठेवली आहे. यामुळे भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत थोपटे यांच्या भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट आमने-सामने लढत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही अनेक ठिकाणी आक्रमक पवित्रा घेत भोरच्या मैदानात उतरले आहेत.

मात्र, निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. भोर नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अर्ज दाखल करणारे नितीन सोनवले यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. सोनवले आता शिवसेनेकडून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेणार असून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी सक्रिय भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचा प्रमुख उमेदवारच हातातून गेल्याने पक्षाची भोरमधील समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहेत.

या घडामोडीमुळे भोरमध्ये शिवसेनेची ताकद कमी झाल्याने लढत आता जवळजवळ द्विपक्षीय बनली आहे. संग्राम थोपटे यांच्या प्रभावामुळे भाजपचे वर्चस्व वाढलेले असताना, त्यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीने हा डाव आखल्याचे स्पष्ट आहे.

सोनवले यांच्या माघारीनंतर आगामी निवडणुकीत महायुतीच्या दोन प्रमुख पक्षांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट टक्कर रंगणार आहे. ही थेट लढाई होतं असताना भोर नगरपालिकेच्या लढतीतून महायुतीतील अंतर्गत स्पर्धा किती तीव्र आहे हे स्पष्ट झाले आहे. आता भाजप-शिवसेनेच्या फोडाफोडीवरून भिडत असताना यात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील उडी घेतली असून महायुतीतील या संघर्षाचा पुढील अंक काय असेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahabaleshwar Tourism: फ्रेंड्ससोबत धमाल करायचीये? महाबळेश्वरजवळची ही ‘Hidden’ ठिकाणं ठरतील परफेक्ट

Maharashtra Live News Update: पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन जण अडकले

Tejashree Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधानविषयी या गोष्टी माहित आहेत का?

Shocking: कोर्टात रक्तरंजित थरार! न्यायाधिशांसमोरच महिलेच्या डोक्यात कुऱ्हाड घातली, बेळगावमधील भयंकर घटना

Sydney BMW Crash: पोटात ८ महिन्याचं बाळ, भरधाव कारने गर्भवतीला उडवले, एका क्षणात दोघांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT