sunetra pawar  Saam tv
मुंबई/पुणे

सुनेत्रा अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाला होकार? अरोरा निरोप घेऊन मुंबईला रवाना, बैठकीत काय ठरलं?

sunetra pawar : सुनेत्रा अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाला होकार असल्याची माहिती समोर आली आहे. नरेश अरोरा त्यांचा निरोप घेऊन मुंबईला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vishal Gangurde

सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याची जोरदार चर्चा सुरू

सूत्रांच्या माहितीनुसार शपथविधीबाबत हालचाली सुरू

नरेश अरोरा मुंबईकडे रवाना झाल्याची सूत्रांकडून माहिती

अजित पवारांच्या निधनाने पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. काल अजित पवारांच्या प्रेताला अग्नी देण्यात आला. त्यानंतर आज शुक्रवारी राख सावडण्याचा विधी झाला. अजितदादांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या विलिनीकरणादरम्यान सुनेत्रा अजित पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी होकार दिला असून नरेश अरोरा निरोप घेऊन मुंबईला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

अजित पवार गटाने विलिनीकरणापूर्वी पक्षनेता निवडण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. सुनेत्रा पवारांना विधिमंडळ पक्षनेता बनवण्याचे प्रयत्न असल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट केले. पक्षनेता ठरवण्यासाठी उद्या बैठक होऊ शकते. त्यानंतर त्याच दिवशी शपथविधी होऊ शकतो असंही भुजबळ म्हणालेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पार्श्वभूमीवर राजकीय सल्लागार नरेश अरोरा आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी नरेश अरोरा यांना होकार दिला. त्यानंतर नरेश अरोरा हे त्यांच्या निरोप घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत.

विधिमंडळ पक्षनेता निवडीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या नेत्यांची तातडीची बैठक सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या ५ नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला सुरुवात झाली आहे. या मंत्रिमंडळात कोणाला कोणाला कुठले स्थान द्यायचे, यासंदर्भात बैठक सुरू आहेच. त्यानंतर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयानंतर उद्या शपथविधीचा वेळ ठरवला जाणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी सकाळी ११ वाजताची वेळ निश्चित केल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: "दादा मला माफ करा"; महेश लांडगे यांनी मागितली दादांच्या फोटोसमोर हात जोडून माफी

बोटं कापली, डोकं ठेचलं, गळा चिरला अन्...; बारावीतील तरुणीसोबत जे घडलं त्यानं गाव हादरलं

आभाळाएवढं दु:ख बाजूला ठेवून शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर; नीरा नदीच्या काठावर केली दूषित पाण्याची पाहणी|VIDEO

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली?

Saturday Horoscope: जोडीदारासोबत दिवस उत्तम, 5 राशींच्या व्यक्तींना पैशांची चणचण; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT