Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: गार्डनमध्ये एकटीला बघून नियत फिरली, दिव्यांग महिलेसोबत पोलिसाचं भयंकर कृत्य, नागरिकांनी बघितलं अन्...

Mumbai Police: मुंबईमध्ये एका पोलिसाने दिव्यांग महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. गार्डनमध्ये बसलेल्या या महिलेसोबत अश्लिल चाळे करत असताना या पोलिसाला काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी त्याला चांगला चोप दिला.

Priya More

मुंबईमध्ये एका दिव्यांग महिलेसोबत पोलिसाने अश्लिल कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली. गार्डनमध्ये या महिलेला एकटीला पाहून हा पोलिस तिच्याजवळ गेला आणि तिच्यासोबत अश्लिल चाळे करू लागला. गार्डनमध्ये आलेल्या काही नागरिकांनी हा प्रकार पाहून त्यांनी पोलिसाला रोखलं आणि त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर या पोलिसाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मुंबईमधील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील एका मैदानात घडली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भाऊसाहेब हिरे गार्डनमध्ये एक दिव्यांग महिला बसली होती. त्याठिकाणी गणवेशामध्ये पोलिस आला. या महिलेला एकटीला पाहून पोलिसाची नियत फिरली. त्याने तिच्यासोबत अश्लिल चाळे केले.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, या गार्डनमध्ये एक पोलिस कर्मचारी एका दिव्यांग महिलेच्या शेजारी बसला होता. तो तिच्यासोबत अश्लिल कृत्य करत होता. हे दृष्य पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या संख्यने गर्दी केली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यापूर्वी जमावाने पोलिसाला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा सहाय्यक उपनिरीक्षक दारूच्या नशेत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेलं. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली.

या घटनेमुळे ताडदेव परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, संबंधित महिला दिव्यांग आहे. अटक करण्यात आलेला सहाय्यक उपनिरीक्षक सशस्त्र पोलिस विभागाशी संलग्न आहे आणि सध्या तो एल विभाग-२ येथे तैनात आहे. विशेष म्हणजे ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या गार्डनच्या जवळच पोलिस स्टेशन आहे. या गार्डनमध्ये स्थानिक नागरिक फिरण्यासाठी लहान मुलं खेळण्यासाठी येतात. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT