Lalbaugcha Raja Video Saam tv
मुंबई/पुणे

Lalbaugcha Raja Video : लालबाग राजाच्या दर्शनाच्या रांगेत महिलेला अचानक आली फिट; भर गर्दीत वर्दीतील 'देवमाणूस' मदतीला धावला

Lalbaugcha Raja Video News : लालबाग राजाच्या रांगेत महिलेला अचानक फिट आली. त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला तातडीने मदत केली.

Vishal Gangurde

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रसिद्ध लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाची जोरदार चर्चा होत आहे. लालबाग राजा मंडळ कार्यकर्ते आणि बाऊन्सरमुळे टीकेचे धनी होत आहे. यंदाही लालबाग राजाच्या दर्शनासाठी भक्तांनी केलेल्या गर्दीने सर्व विक्रम मोडले आहेत. या लालबाग राजाच्या मंडपात कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांनी भक्तांना धक्काबुकी आणि रेटारेटी केल्याची देखील घटना घडल्या आहेत. त्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता नवा व्हिडिओ समोर आला आहे. लालबाग राजाच्या दर्शनाच्या रांगेत असताना एका महिलेला अचानक फिट आली. त्यानंतर एक पोलीस कर्मचारी मदतीला धावला.

गणेशोत्सवामुळे लालबागमध्ये मोठी सजावट पाहायला मिळत आहे. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात दरवर्षी प्रमाणे यंदाही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ही गर्दी मंडळाच्या कार्यकर्त्यांना देखील जुमानता येईना. त्यामुळे मंडपात धक्काबुकीच्या घटना घटना पाहायला मिळाल्या आहेत. तर या राजाच्या मंडपात व्हीआयपी आणि सर्वसामान्य लोकांना दर्शनासाठी वेगळी रांग आहे. यावरून अनेकांनी राजाच्या चरणी भेदभाव होत असल्याचा आरोप केला आहे. मंडपात सेलेब्रिटी आणि सर्वसामान्यांना वेगळा न्याय मिळत असल्याचा आरोप काही भाविकांनी केला आहे.

एका अभिनेत्रीलाही धक्काबुकी

लालबाग राजाच्या दरबारात अनेक सेलेब्रिटींनी देखील हजेरी लावली. काही दिवसांपूर्वी हिंदी टेलिव्हिजनवरील 'कुमकुम भाग्य' आणि 'पांड्या स्टोर' मालिकांमधील अभिनेत्री सिमरन बुधरुपने हजेरी लावली. दर्शनासाठी आलेल्या सिमरनसोबत काही सुरक्षा रक्षकांनी धक्काबुकी केल्याचीही घटना घडली आहे. अभिनेत्रीच्या आईने लालबागच्या राजाच्या दरबारात तिने फोटो काढला. त्यानंतर तेथील सुरक्षा रक्षकांनी अभिनेत्रीच्या आईचा फोन हिसकावून घेतला. त्यानंतर सिमरनने मध्यस्थी केली. त्यावेळी महिला बाऊन्सर्सने तिच्यासोबत असभ्य वर्तन केले, असा अभिनेत्रीचा आरोप आहे. या अभिनेत्री मंडपातील संपूर्ण अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. अभिनेत्रीने संपूर्ण प्रकारावरून नाराजी व्यक्त केली. या प्रकाराची चर्चा सुरु असताना आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.

खाकीतला देवमाणूस मदतीला धावला

नेहमीप्रमाणे आज लालबाग राजाच्या दर्शनासाठी हजारोंची रांग लागली होती. या हजारोंच्या रांगेत असताना एका महिलेला अचानक फिट आली. या महिलेला अचानक फिट आल्यानंतर महिलेला उचलून गर्दीतून मार्ग काढत पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. या महिलेला पोलिसांच्या वाहनानेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भर गर्दीतून पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला उचलून वाहनात बसवलं. त्यानंतर ही गाडी रुग्णालयााकडे रवाना झाली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या तत्परतेचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Decoration Ideas : गणपतीसाठी डेकोरेशन व पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, जाणून घ्या पूर्ण यादी

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT