Viral Video: एकच नंबर काका...गणपती विसर्जन मिरवणुकीचा हा VIRAL VIDEO बघायलाच हवा!

Ganapati Festival Viral Video: सोशल मीडिया अनेक व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. मात्र एक गणपती विसर्जनाचा व्हिडिओ आहे ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
Viral Video
Ganapati Festival Saam Tv
Published On

सध्या राज्यात गणेशोत्सव या सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. लहानपासून ते मोठ्या पर्यंत प्रत्येक व्यक्ती गणरायाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करत आहे. मात्र आता काही ठिकाणी गणरायाला निरोप देण्यात येत आहे. निरोप देताना तोही थाटामाटात असा निरोप देत आहेत.

सोशल मीडियावर अनेक मिरवणूकीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र सध्या लाडक्या गणरायाला निरोप देतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात गणपती बाप्पाला निरोप देताना एका व्यक्तीने बाप्पाची मुर्ती डोक्यावरती ठेवलेली आहे. मात्र मुर्ती डोक्यावर ठेवून उत्तमरित्या बॅलन्स साधत डान्स (Dance) केलेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, गावातील अनेक कुटुंब गणरायाच्या विसर्जनानिमित्ताने गणपती बाप्पाच्या मूर्ती घेऊन जात आहेत. विशेष म्हणजे सर्वांनी गणपती बाप्पाची मू्र्ती डोक्यावर धरलेल्या आहेत. सर्व एका वाटेने जाताना व्हिडिओत दिसून येत आहेत. मात्र काही वेळात यातील एक व्यक्ती पुढे येतो आणि डोक्यावर मूर्ती ठेवून पारंपारिक डान्स असा डान्स करण्यास सुरुवात करतो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर गणपती (Ganpati) बाप्पाची मूर्ती एकदाही पडत नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला आहे. मात्र तो व्हिडिओ तुम्हाला ''@beingkokani_and pooja_tambe08'' या अकाउंटवर पाहता येईल. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये ''गणपती विसर्जन पेण रायगड '' असे लिहिण्यात आलेले आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमधून समजत आहे की, व्हायरल व्हिडिओ रायगडमधील आहे. व्हिडिओ पाच दिवसांपूर्वी पोस्ट (Post) करुन आतापर्यंत अनेक हजार नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स आणि कमेंट्स केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''गणपती बाप्पा मोरया रे'' तर एकापेक्षा अनेकांनी त्या व्यक्तीचे कौतुक केले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत.

Viral Video
Viral Video: ही खरी संस्कृती! आजीबाईंचा डान्स पाहून नेटकरी म्हणाले...अशी ही पिढी पुन्हा होणे नाही; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com