Job At Google: बिहारच्या तरुणीला गूगलमध्ये ६० लाखांचं पॅकेज, कोणती पोस्ट, काय करणार काम?

Alankrita Sakshi Get 60 Lakh Package At Google: गूगलसारख्या मोठ्या कंपनीत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. बिहारच्या एका तरुणीला गूगलमध्ये ६० लाखांचे पॅकेज मिळालं आहे.
Job At Google
Job At GoogleSaam Tv
Published On

प्रत्येक व्यक्तीला आपल्या करिअरमध्ये खूप यशस्वी व्हायचे असते. चांगली नोकरी, जास्त पगाराचे पॅकेज मिळवायचे अशी प्रत्येकाची इच्छा असते.त्यात सध्या आयटी सेक्टर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगभरातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी गूगलमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. गूगल कंपनीत भागलपूर जिल्ह्यातील अलंकृता साक्षी या मुलीला नोकरी मिळाली आहे. वर्षाला ६० लाखांचे पॅकेज या मुलीला मिळाले आहे. (Who Is Alankrita Sakshi)

Job At Google
Patangrao Kadam Success Story: 'शिक्षणसम्राट ते सहृदयी लोकनेता', वयाच्या २० व्या वर्षी विद्यापीठाची स्थापना; पतंगराव कदमांचा संघर्ष साधा नाही

अलंकृता साक्षीला गूगल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर पदावर नोकरी मिळाली आहे. अलंकृता साक्षी ही मूळती भागलपुर जिल्ह्यातील सिमरा गावची होती. ती सध्या झारखंडमध्ये राहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलंकृता साक्षी हिने याआधी विप्रो, सॅमसंग यांसारख्या मोठ्या कंपनीत काम केले होते. अलंकृता साक्षीचे वडील झारखंडमध्ये एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहेत तर तिची आई शाळेत शिक्षिका आहे.अलंकृताचा नवरा मनीष कुमारदेखील सॉफ्टवेअर कंपनीत काम करत आहे.

Job At Google
Success Story: शेतजमीन भाड्याने घेऊन राबला; आता उभारली १२०० कोटींची कंपनी, तरुणाची यशोगाथा वाचून अवाक् व्हाल!

अलंकृताचं शिक्षण

अलंकृता झारखंडमधील कोडरमामध्ये लहानाची मोठी झाली. तिने बारावीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालयातून झालं आहे. तिने बी.टेकची पदवी घेतली. त्यानंतर बंगळुरुमधील विप्रो कंपनीत तिने काम केले. गुगलसारख्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळाल्याने अलंकृताचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तिच्या या यशाचं कुटुंबियांना खूप कौतुक आहे.

Job At Google
Success Story: उधारीवर पुस्तके, इंटरनेटसाठी रोज पायपीट, युट्यूबवरुन शिक्षण; NEET पास; आता डॉक्टर होणार,आदिवासी मुलाची यशोगाथा वाचा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com