Jitendra Awad  saam tv
मुंबई/पुणे

Jitendra Awhad : मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्यासह २२ जणांवर गुन्हा; अटकेचीही टांगती तलवार, काय आहे नेमकं प्रकरण?

Jitendra Awhad News : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह २२ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर अटकेचीही टांगती तलवार आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

ठाणे : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आव्हाड यांच्यावर खोट्या गुन्ह्याचा कट रचण्याचा आरोप आहे. तसेच विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेवर दबाव टाकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या दोन्ही वकिलासंहित २२ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांच्यावर अटकेचीही टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोट्या गुन्ह्याचा कट रचण्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या दाखल झालेल्या ३५४ अंतर्गत दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच पीडित महिलेवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या गुन्ह्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या दोघा वकिलांसह २३ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी मुंब्रा येथे राहणाऱ्या इस्टेट इजंट शबाना सोंधी यांना अटक करण्यात आली आहे. तर आव्हाड यांच्यासह इतरांना तातडीने अटक करा, अशी मागणी पीडित महिलेने पत्रकार परिषदेत केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

ठाण्यातील मुंब्रा वाय जंक्शन येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा हा नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यादरम्यान आव्हाड यांनी दोन्ही हातांनी पकडून बाजूला हटवल्याचा आरोप पीडित महिलेचा आहे. या प्रकरणी आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या घटनेनंतर आव्हाड यांनी जुन्या घटनेवरून एकाला हाताशी धरून अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे.

या प्रकरणाच्या तपासात कोणताही पुरावा उपलब्ध न झाल्याने हा ॲट्रॉसिटीचा कट अयशस्वी ठरल्याचा आरोप पीडित महिलेचा आहे. तसेच आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांकडून कलम ३७०, ३७० (अ), ५०४, ३४, सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमन कलम ३, ४, ५, चे कलम ४, ६, १०, १२, १७ प्रमाणे पीटा, पॉस्कोचा गुन्हा दाखल केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. तसेच हे आरोपही सिद्ध न झाल्याचे पीडित महिलेचं म्हणणं आहे.

यानंतर ठाणे सत्र न्यायालयाने 'बी' संमरी मंजूर करीत, या खोट्या गुन्ह्यातील फिर्यादी आणि साक्षिदारांवरच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. याच प्रकरणी रौनक आजम शेख (४२), शबाना शेख (४३),शाहिस्ता कुरेशी (३३),सिमरन सोधी (४०), शिवा जगताप, जितेंद्र आव्हाड व त्यांच्या इतर समर्थकांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Health Tips: झोपण्यापूर्वी गूळ खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

China: तुम्हाला माहिती आहे का? चीनमध्ये मुलांना 'या' अनोख्या गोष्टी शिकवल्या जातात

Viral Video: नजर हटी दुर्घटना घटी! बोटीवर चालता चालता तरुणाचा गेला तोल अन्...पाहा पुढे नेमकं काय घडलं

CM Shinde: मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, पण...,CM पदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT