Team India Parade Bus : काही दिवसांनी आम्हालाही तिकडेच जावे लागेल; गुजरात पासिंग बसवरून जितेंद्र आव्हाड यांचा टोला

Jitendra Awhad criticized bcci : जरातच्या बसवरून जितेंद्र आव्हाड यांनी बीसीसीआयवर टीका केली आहे. काही दिवसांनी आम्हालाही तिकडेच जावे लागेल, असं म्हणत आव्हाड यांनी टीका केली आहे.
काही दिवसांनी आम्हालाही तिकडेच जावे लागेल; गुजरात पासिंग बसवरून जितेंद्र आव्हाड यांचा टोला
Jitendra Awhad Saam tv
Published On

रुपाली बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : टीम इंडिया विश्वचषक जिंकल्यानंतर पहिल्यांदा मुंबईत येणार आहे. मुंबईत टीम इंडियाची मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत विजयी रॅली आयोजित केली आहे. टीम इंडियाच्या विजयी रॅलीसाठी ओपन बस देखील सज्ज झाली आहे. ही ओपन बस गुजरात पासिंग आहे. आता याच गुजरात पासिंग बसवरून राजकारण पेटलं आहे. टीम इंडियाच्या विजय रॅलीसाठी आणलेल्या गुजरात पासिंग बसवरून सुरुवातीला आमदार आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयवर टीका केली. त्यानंतर आता शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी ही बीसीसीआयला टोला लगावला आहे.

मुंबईत टीम इंडियाच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. या विजयी रॅलीत सर्व खेळाडू सहभागी होणार आहेत. टीम इंडियासाठी वानखेडे स्टेडिअमवरील कार्यक्रम आयोजित केला आहे. मुंबईत विजय रॅलीसाठी आणलेल्या गुजरातच्या बसवरून राजकारण सुरु झालं आहे. गुजरातच्या बसवरून आदित्य ठाकरेंनी टीका केली. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी आम्हाला टोला लगावला. बेस्टच्या बसेस नाहीत का? काही दिवसांनी आम्हालाही तिकडे जावं लागेल, असं म्हणत आव्हाड यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली.

काही दिवसांनी आम्हालाही तिकडेच जावे लागेल; गुजरात पासिंग बसवरून जितेंद्र आव्हाड यांचा टोला
Nagpur Deekshabhoomi पार्किंग प्रकरणावर Aaditya Thackeray यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

'आम्ही २००७ साली मिरवणूक विमानळावरून काढली होती. त्यानंतर वानखेडेवर आणली होती. मुंबई पालिकेकडे पर्यटनासाठी दोन बसेस आहेत, आम्ही त्याचे रुपांतर केले होते. आजही त्या बसेस उपलब्ध आहेत. मात्र, आता बसेस देखील गुजरातमधून येत आहे. आमच्या बेस्टच्या बसेस नाही आहेत का? काही दिवसांनी वाटतं की, आम्हाला देखील तिकडे जावे लागेल. मुंबई क्रिकेट असोशिएशनचा काही रोलच नाही आहे. या बससाठी कोणाची तरी असली पाहिजे होती ना? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

काही दिवसांनी आम्हालाही तिकडेच जावे लागेल; गुजरात पासिंग बसवरून जितेंद्र आव्हाड यांचा टोला
Worli Vidhansabha News: वरळी विधान सभेवरुन आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यात जुंपली

'आमच्या चालकांना काय मुंबईचे रुट माहिती नाही का? नशीब गुजरातचे पोलीस आणले नाही, बरं झालं. मराठी माणसाची ओळख पुसू नका. महाराष्ट्रात मुंबईतून सर्वाधिक खेळाडू आपण दिले आहेत. बस बघितल्यावर डोळे दिपायला लागले, असेही आव्हाड पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com