Jammu Kashmir Terrorist Attack: कुपवाडात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री; २ दहशतवाद्यांचा खात्मा

Terrorist Attack in Jammu Kashmir's Kupwada Area: जम्मू काश्मीरमधील कुपवाडातील केरणध्ये सुरक्षा दले आणि दहशतवात्यांमध्ये पुन्हा चकमक सुरू झाली आहे. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
Jammu Kashmir Terrorist Attack
Jammu Kashmir Terrorist AttackSaam Digital
Published On

जम्मू काश्मीरमधील कुपवाडातील केरणध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. LOC जवळ झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवली असून सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू- काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वी डोडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले होते.

Jammu Kashmir Terrorist Attack
Budget 2024 Intresting Fact: अर्थसंकल्प लाल रंगाच्या बॅगमधूनच का सादर केला जातो? काय आहे या मागचा रंजक इतिहास? जाणून घ्या

आज पहाटेपासून दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये जम्मू-काश्मीरमधील डोडा भागात पुन्हा चकमक सुरू झाली आहे. डोडामध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाच्या कारवाईचा आज चौथा दिवस आहे. या भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मुळाल्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आली आहे .

त्यानंतर दुपारी कुपवाडातील केरणमध्येही दहशदवादी लपल्याची माहिती मिळाली होती. सर्च ऑपरेशन सुरू असताना दहशदवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत २ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवली असून सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान कास्तीगड भागातील जद्दन बाटा गावात पहाटे 2 वाजता चकमक सुरू झाली होती.

Jammu Kashmir Terrorist Attack
Indian Crows : भारतीय कावळ्यांचा केनियाला त्रास? सरकारने 10 लाख कावळ्यांना मारण्याचा दिला आदेश, काय आहे कारण?

कठुआच्या बंदोटा येथेही झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दुडू बसंतगड परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम सुरू केली आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी ड्रोन आणि यूएव्हीची मदत घेतली जात आहे. स्पेशल फोर्सेसच्या जवानांनीही परिसरातील जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. दरम्यान सोमवारी शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर हल्ला केला ज्यामध्ये लष्कराच्या एका कॅप्टनसह चार जवान शहीद झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com