nagar news, Shevgaon News saam tv
मुंबई/पुणे

Shevgaon News : शेवगावातील राड्या प्रकरणी पाेलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, 31 जणांना घेतलं ताब्यात

पोलीस प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवता शांततेचे आवहान केल आहे.

Siddharth Latkar

- सुशिल थाेरात

Nagar News : नगर जिल्ह्यातील शेवगाव (shevgaon) शहरात साेमवारी रात्री दोन गटात वाद निर्माण झाला हाेता. त्यानंतर दगडफेक देखील झाली. या प्रकरणी पाेलिसांनी सुमारे 250 ते 300 जणांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आत्तापर्यंत 31 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या शेवगाव येथे तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Maharashtra News)

छत्रपती संभाजी महाराज जयंती ((chhatrapati sambhaji maharaj jayanti) निमित्त शेवगाव शहरात कार्यक्रम सुरु हाेता. त्यानंतर गाडीचा कट लागल्याचं कारणावरून दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून समोर येत आहे. या दगडफेकीत काही दुकानांचे तसेच वाहनांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच दोन ते तीन पोलीस जखमी झाले आहेत.

दरम्यान रविवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शेवगावमध्ये मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मिरवणूक सुरू झाली. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी होते. मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली.

यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने एका गटाने दगडफेक केली, तर दुसऱ्या गटाने आमच्या धार्मिक स्थळावर आधी दगडफेक केल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांनी रात्री उशिरा कोंबिंग ऑपरेशन राबवून या दंगलीत असलेल्या तरुणांना संशयावरुन अटक करण्याचे सत्र सुरू केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सध्या शेवगावात तळ ठोकून आहेत. पोलीस प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवता शांततेचे आवहान केल आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT