PMP Bus Fare Hike Saam Tv
मुंबई/पुणे

PMP Bus Fare Hike: पुणेकरांचा प्रवास महागला! PMP बसच्या तिकिटात दुप्पटीने वाढ, आता किती पैसे मोजावे लागणार?

PMPML Bus: पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण पुणेकरांचा प्रवास महागला आहे. पीएमपी बसच्या प्रवासासाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. तिकीटाचे दर किती झाले ते घ्या जाणून...

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणेकरांचा प्रवास महागला आहे. कारण पीएमपी बसच्या तिकिटात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. प्रवासाचे टप्प्याचे अंतर दोन ऐवजी पाच किलोमीटरचे करण्यात आले आहे. लांब प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मात्र जवळ प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. पीएमपीने तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

पीएमपी बसचे तिकीट जवळपास दुप्पटीने वाढल्याने पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पुणेकरांचा प्रवास महागणार असला तरी दोन किलोमीटरच्या टप्प्याऐवजी पाच किलोमीटरचा टप्पा असणार आहे. त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासाही मिळणार आहे. पीएमपीने गेल्या ११ वर्षात तिकीट दरवाढ केलेली नव्हती. इतक्या वर्षानंतर पीएमपीने तिकीटाचे दर वाढवले आहे.

पगार, सीएनजी, डिझेल आणि बसच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढलेला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून तिकीट दरवाढीसंदर्भात चर्चा होती. अखेर पीएमपीने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. पीएमपीची सेवा ही पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीमध्ये दिली जाते. रोज १२ लाख प्रवासी पीएमपी बसने प्रवास करतात.

किती किलोमीटर प्रवासासाठी किती पैसे?

१ ते ५ किमी - प्रस्तावित दर १० रुपये. ३ ते १२ वर्ष वयोगटासाठी ५ रुपये. 

५.१ ते १० किमी - प्रस्तावित दर २० रुपये. ३ ते १२ वर्ष वयोगटासाठी १० रुपये. 

१०.१ ते १५ किमी - प्रस्तावित दर ३० रुपये. ३ ते १२ वर्ष वयोगटासाठी १५ रुपये. 

१५.१  ते २० किमी - प्रस्तावित दर ४० रुपये. ३ ते १२ वर्ष वयोगटासाठी २० रुपये. 

२०.१  ते २५ किमी - प्रस्तावित दर ५० रुपये. ३ ते १२ वर्ष वयोगटासाठी २५ रुपये. 

२५.१ ते ३० किमी - प्रस्तावित दर ६० रुपये. ३ ते १२ वर्ष वयोगटासाठी ३० रुपये. 

३०.१ ते ४० किमी - प्रस्तावित दर ७० रुपये. ३ ते १२ वर्ष वयोगटासाठी ३५ रुपये. 

४०.१ ते ५० किमी - प्रस्तावित दर ८० रुपये. ३ ते १२ वर्ष वयोगटासाठी ४० रुपये. 

५०.१ ते ६० किमी - प्रस्तावित दर ९० रुपये. ३ ते १२ वर्ष वयोगटासाठी ४५ रुपये. 

६०.१ ते ७० किमी - प्रस्तावित दर १२० रुपये. ३ ते १२ वर्ष वयोगटासाठी ६० रुपये. 

७०.१ ते ८० किमी - प्रस्तावित दर १२० रुपये. ३ ते १२ वर्ष वयोगटासाठी ६० रुपये. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT