Sakshi Sunil Jadhav
नाचणीची इडली शरीरासाठी खूप हेल्दी मानली जाते. ही रेसिपी बनवायलाही अगदी साधी सोपी असते.
अर्धा कप उडदाची डाळ, १ चमचा मेथीचे दाणे, १ कप नाचणीचे पीठ, मीठ इ.
इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे भिजायला घाला. साधारण ४ ते ५ तास ही भिजत ठेवा.
भिजवून झाल्यानंतर मेथीचे दाणे आणि उडदाच्या डाळीची पेस्ट तयार घ्या. पेस्ट एकदम सॉफ्ट ठेवा.
आता एका मिक्सरच्या भांड्यात नाचणीचे पीठ किंवा बारिक नाचणी तुम्ही बारिक करुन पेस्ट घेऊ शकता.
पेस्ट थोडी जाडसरच ठेवा नाहीतर तुमच्या इडल्या तुटू शकतात. त्यामुळे पाण्याचा वापर कमी प्रमाणातच करा.
आता नाचणीचं पीठ आणि डाळींचे पीठ एकत्र मिक्स करुन हाताने थोडं मिक्स करून रात्रभर झाकून ठेवा.
शेवटी एका इडलीच्या भांड्याला तूप लावून त्यामध्ये बॅटर घालून घ्या. १५ मिनिटे इडल्या वाफवून गरमा गरम सर्व्ह करा.