Pune Accident : वाहतूकीचे नियम तोडले, कंटेनरला अडवण्याचे आदेश; पुण्यात भरधाव वाहनाने पोलीस अधिकाऱ्याला चिरडलं

Pune Maval Police Accident : मिथुन वसंत धेंडे (वय ४९, रा. उरुळी कांचन, पुणे) सध्या वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणाऱ्या अपघातात मृत्यू झालेल्या वाहतूक पोलिसाचं नाव आहे.
traffic police officer accident Maval
traffic police officer accident MavalSaam Tv News
Published On

दिलीप कांबळे, साम टिव्ही

पुणे (मावळ) : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरिल वडगाव फाटा चौकात कर्तव्यावर असणाऱ्या एका वाहतूक पोलिसाला चिरडलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिथुन वसंत धेंडे (वय ४९, रा. उरुळी कांचन, पुणे) सध्या वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणाऱ्या अपघातात मृत्यू झालेल्या वाहतूक पोलिसाचं नाव आहे. वडगाव मावळ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई बाजूकडून चाकणकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनर चालकाने वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चिरडलं. यात धेंडे यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, संबंधित कंटेनर चालकाने वाहतूक नियमांची पायमल्ली केल्यामुळे पुणे ग्रामीण कंट्रोलवरून कंटेनर थांबविण्याचे आदेश झाल्याने कंटेनर थांबवत असताना, भरभाव वेगाने वाहतूक पोलिसाला चिरडलं. या अपघाताचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. काल मंगळवारी रोजी धेंडे यांचा वाढदिवस होता. या अपघाती निधनानं मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

traffic police officer accident Maval
Gaja Marne : गुंड गजा मारणेची मटण पार्टी भोवली, पुण्यातील एका अधिकाऱ्यासह ४ पोलिसांचे निलंबन

पुण्यातील एका अधिकाऱ्यासह ४ पोलिसांचं निलंबन

दरम्यान, गुंड गजा मारणे याची मटण पार्टी पुणे पोलिसांना भोवली आहे. पुणे पोलिस दलातील १ अधिकाऱ्यासह ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सांगली कारागृहात घेऊन जाताना मारणे याने पोलिसांच्या समक्ष ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणे आणि बेजबाबदारपणे वागणुकीमुळे पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे.

या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु यासह हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे, पोलिस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित करण्यात आळे आहे. मोक्का कारवाई अंतर्गत गजा मारणे पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला सांगली तुरूंगात पाठवलं होतं, त्यावेळी ढाब्यावर मटण पार्टी झाली अन् पोलिसांना भोवली.

traffic police officer accident Maval
Success Story: आईचा संघर्ष पाहून IAS होण्याच्या जिद्दीला पेटली, दिवसा काम अन् रात्री अभ्यास, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com