Nashik Crime : शेतातील विहिरीत डिझेल सदृश पदार्थाचा तवंग; तपासणीत धक्कादायक माहिती आली समोर, सुरु होती डिझेल चोरी

Nashik News : इंधन वाहिनी नजीकच असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत डिझेलसदृश पदार्थाचा तवंग आढळून आल्यानंतर कंपनी प्रशासन खडबडून जागे झाले होते. यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता
Nashik Crime
Nashik CrimeSaam tv
Published On

अजय सोनवणे 
नाशिक
: नाशिकच्या मनमाडजवळ असलेल्या अनकवाडे शिवारात भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई- मनमाड- बीजवासन या उच्चदाब इंधन वाहिनीला छिद्र पाडण्यात आले. याठिकाणाहून अनधिकृतरित्या इंधन चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे खळबळ उडाली असून सदर प्रकार उघड झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिकच्या मनमाड परिसरात असलेल्या अनकवाडे शिवारातील भारत पेट्रोलियम कंपनीच्या इंधन वहिनीतुन इंधन चोरी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या इंधन वाहिनी नजीकच असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत डिझेलसदृश पदार्थाचा तवंग आढळून आल्यानंतर कंपनी प्रशासन खडबडून जागे झाले होते. यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. 

Nashik Crime
Khadakwasla : पोहायला गेला तो परतलाच नाही; खडकवासला पाणलोट क्षेत्रात तरुणाचा बुडून मृत्यू

दीड इंची पाईप जोडून सुरु होती इंधन चोरी 

दरम्यान विहिरीत डिझेल सदृश्य पदार्थ आढळल्याने बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी विहिरीतील पाण्याचे नमुने घेत आणि सुमारे एक किलोमीटरच्या लांबीपर्यंत इंधन वाहिनीवरील माती उकरून तपासणी केली. यानंतर विहिरी जवळच असलेल्या ओढ्यात २४३.३०० किमीवर इंधनवाहिनीला छिद्र करून दीड इंची जीआय पाईप जोडल्याचे उघड झाले. साधारण ४८ फूट लांबीपर्यंत पाईप जमिनीत पुरण्यात आला होता. त्यातून इंधन चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

Nashik Crime
Adulterated Milk : १० लाखांचे भेसळयुक्त दूध केले नष्ट; दूध वाहतूक करणाऱ्या पाच टँकरवर कारवाई

अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल 

पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संशयितांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान इंधन कंपनीच्या वाहिनीला थोडी जरी गळती झाली; तर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तत्काळ माहिती मिळत असल्याचा दावा कंपनी प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र इंधन वाहिनीला दीड इंच पाईप जोडून इंधन चोरीचा प्रयत्न झाल्याने आता इंधन वाहिनीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com