Adulterated Milk
Adulterated MilkSaam tv

Adulterated Milk : १० लाखांचे भेसळयुक्त दूध केले नष्ट; दूध वाहतूक करणाऱ्या पाच टँकरवर कारवाई

Sangli News : दुधाचे टँकर घेरडी (ता. सांगोला) येथील एलकेपी दुध शितकरण केंद्र येथून दुध घेवून कोल्हापूर जिल्ह्यातील एका कंपनीकडे जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे
Published on

सांगली : दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यात सांगलीच्या नागजमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त दुध वाहतूक करणाऱ्या ट्रॅकरवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक करणारे पाच टँकर ताब्यात घेऊन त्यामधील ७५ हजार लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील घेरडी येथून गाईचे दूध घेऊन पाच टँकर कोल्हापूरकडे निघाल्याची माहिती मिळाली अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. दुधाचे टँकर घेरडी (ता. सांगोला) येथील एलकेपी दुध शितकरण केंद्र येथून दुध घेवून कोल्हापूर जिल्ह्यातील एका कंपनीकडे जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील नागज फाटा या ठिकाणी सदरचे टँकर आढळून आले. 

Adulterated Milk
Khadakwasla : पोहायला गेला तो परतलाच नाही; खडकवासला पाणलोट क्षेत्रात तरुणाचा बुडून मृत्यू

दुधात आढळली मिठाची भेसळ 

दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त निलेश मसारे, अन्न सुरक्षा अधिकारी पवार व स्वामी, नमुना सहाय्यक कवळे व कसबेकर यांच्या पथकाने रविवारी दुपारी नागज फाटा येथे सदरची कारवाई केली आहे. दुध वाहतुक करणाऱ्या पाच टँकरची तपासणी केली. टँकरमधील दुधाची इन्स्टंट स्ट्रीपच्या सहाय्याने प्राथमिक तपासणी केली असता यात मिठाची भेसळ आढळून आली. तर दुधाचे तीन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

Adulterated Milk
Beed : सरपंच पतीकडून मनमानी कारभार; ३५ लाखांच्या भ्रष्ट्राचाराचा आरोप, ग्रामपंचायतीसमोर उपोषण

७५ हजार लिटर दूध केले नष्ट 
भेसळ आढळून आलेल्या ७५ हजार लिटर गाय दुधाचे पाच ट्रॅकर ज्याची किंमत साधारण १० लाख ६३ हजार ८६० रूपये किंमतीचा दुधाचा उर्वरीत साठा भेसळीच्या संशयावरुन ओतून नष्ट केला. तर भेसळयुक्त दुधाचे नमुने घेतले असून दुधाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com