nagar news saam tv
मुंबई/पुणे

Nilwande Dam : ५० वर्षांनंतर गावांत पाणी आले, ग्रामस्थ आनंदले; पंतप्रधानांच्या हस्ते हाेणार पूजन

२६ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरण आणि कालव्यांचे पूजन होणार आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Nagar News : ५० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे धरणाचे पाणी अनेक गावांत पोहचल्याने गावक-यांमध्ये आनंदी वातावरण आहे. विशेष म्हणजे उत्तर नगर जिल्ह्यातील अनेक गावांत दाखल झालेले पाणी पाहण्यासाठी कालव्यानजीक ग्रामस्थांनी पाण्याचे पूजन देखील केले. (Maharashtra News)

अहमदनगर जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून १४ ऑक्टोबरला सोडलेले पाणी मजल दरमजल करत दुष्काळग्रस्त भागात पोहचले आहे. गेल्या पन्नास वर्षापासून पाण्याची वाट बघणारे नागरीक यामुळे अतीशय आनंदी झाले आहेत.

अहमदनगरच्या अकोले, संगमनेर, राहाता तसेच सिन्नर तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांची तहान भागणार आहे. तर गुरांच्या चारा पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. उजव्या कालव्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच हे काम पूर्ण होणार असून अकोले आणि राहुरी तालुक्यातील गावांना हे पाणी पोहचण्याचा मार्ग मोकळा होईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उत्तर नगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी दाखल झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. २६ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरण आणि कालव्यांचे पूजन होणार आहे. ५० वर्षांची प्रतिक्षा संपल्याने राहाता तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी कालवा परिसरात जल्लोष करत महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT