Sangamner News : महाराष्ट्रातील सरकारच्या विराेधात जनता असंतुष्ट : सत्यजित तांबे

आपल्यापेक्षाही गरीब राष्ट्र शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात असे तांबे यांनी नमूद केले.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSaam Tv
Published On

- सचिन बनसाेडे

Sangamner Morcha News : शिक्षणाचे खासगीकरण, शाळा दत्तक योजना, समूह शाळा योजना या राज्य सरकारच्या निर्णायाच्या विरोधात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासह राजकीय नेत्यांनी आज (शनिवार) संगमनेर येथे माेर्चा काढला. पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले हाेते. (Maharashtra News)

Satyajeet Tambe
Political News : 'नितेश राणेंना अक्कल नाही, आम्हांला शहाणपण शिकवू नये'

संगमनेर तालुका समन्वय समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या माेर्चात संगमनेर तालुक्यातील विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे हे देखील सहभागी झाले हाेते. विविध संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला.

Satyajeet Tambe
Shegoan Pandharpur Highway : पालखी मार्ग दुरस्ती करा, अन्यथा रोड ब्लास्ट करू; मुख्यमंत्र्याच्या गटातील आमदारांचा गर्भित इशारा

यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघ आमदार सत्यजित तांबे म्हणाले महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विचित्र निर्णयाच्या विरोधात राज्यामध्ये असंतोष आहे. सरकारी छोट्या शाळा बंद केल्यावर सर्वसामान्य माणसांचे मुले लांब असणाऱ्या शाळांमध्ये जाऊ शकणार नाहीत. लहान शाळा बंद केल्यानंतर भावी पिढीचे नुकसान होईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिक्षणाच्या बाबतीत शासनाचे निर्णय चुकीचे आहे. त्या विरोधात आजचा हा विराट मोर्चा असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी नमूद केले. ते म्हणाले कंत्राटीकरणाचा शासनाने मागे घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करताे. कंत्राटीकरण सरकारी नोकरीला लागलेली एक कीड आहे. कुठल्याच विभागात कंत्राटीकरण असू नये असेही तांबे यांनी नमूद केले.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले कंत्राटी पद्धतीचे शासनाने घेतलेले निर्णय अतिशय चुकीचे हाेते. ते मागे घेण्यात आले आहे. भारतात 30 कोटी लोक निरक्षर असून शाळा बंद करुन निरक्षरांची संख्या वाढवणार का? असा सवाल तांबेंनी केला. पुढे तांबे म्हणाले शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन करण्याचा प्रकार सुरू आहे. तुम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण हिरावून घेत आहात. आपल्यापेक्षाही गरीब राष्ट्र शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात.

Satyajeet Tambe
FDA ची तुळजापुरात खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई, 9 व्यावसायिकांना शटर डाऊनचा आदेश

आमचं हे आंदोलन म्हणजे सरकारकडे आक्रोश, सरकारने निर्णय घ्यावा हीच आमची अपेक्षा असून युवकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न उध्वस्त करणारा सर्व विभागातील कंत्राटीकरनाचा निर्णय मागे घेण्यात यावा, राज्यातील ६५००० सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय रद्द करा, जिल्हा परिषदेच्या १५००० शाळा बंद करू पाहणारी समूह शाळा योजना रद्द करा तसेच जीडीपीच्या दहा टक्के खर्च शिक्षणावर करावा या प्रमुख मागण्या असल्याचे डाॅ. सुधीर तांबे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Satyajeet Tambe
Swabhimani Shetkari Sanghatana : 'स्वाभिमानी'ची ट्रकवर दगडफेक, साखरेची वाहतूक राेखली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com