PM Modi Thane Visit Saam Digital
मुंबई/पुणे

PM Modi Thane Visit : PM मोदींचा ठाणे दौरा, वाहतुकीत मोठा बदल; कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Sandeep Gawade

विधानसभा निवडणुकांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी ठाणे दौऱ्यार येत आहेत. या दौऱ्यात ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत, त्यात भूमिगत मेट्रो ३ लाइनचा पहिला टप्पा समाविष्ट आहे. ठाणे येथे रोड शो नंतर ते रॅलीला संबोधित करणार आहेत. दरम्यान त्यांच्या या दौऱ्यानिमित्त अनेक मार्गांमध्ये बदल करणात आला आहे. प्रवाशांनी या मार्गांचा अवलंब करून सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

ठाणे शहर वाहतूक विभागात तीन राष्ट्रीय महामार्ग येतात व एक राज्य महामार्ग आहे. या मार्गांवरून गुजरातकडे आणि गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. गुतरात, मुंबईकडून घोडबंदर रोड मार्गे तसंच नाशिक, भिवंडीकडून नवी मुंबई, जेएनपीटीकडे तसेच पश्चिम महाराष्ट्रात वाहतूक होत असते. तर याच मार्गांवरू घोडबंदर मार्गे गुजरात नाशिककडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते.

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त घोडबंदर येथे मोठ्या संख्येने लोक जमा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड व अवडज वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

कोणत्या मार्गांवर वाहतूक वळवली

१.गुजरातकडून नवी मुंबईकडे जाणारी वाहने मनोर टेन नाका येथून विक्रमगड-पाली-वाडी-आबिटघर-आटगांवर-शहापूर-मूरबाड-कर्जतमार्गे नवी मुंबई जेएनपीटीकडे वळवण्यात आली आहेत.

२.नाशिककडून नवी मुंबईकडे जाणारी वाहने शहापूर-मुरबाड-कर्जतमार्गे नवी मुंबई जेएनपीटीकडे वळवण्यात आली आहेत

३.मुंबईकडून येणारी जड वाहने ऐरोली लोटनाका मार्गे कर्जत-मुरबाड-शहापूर-वाडा-मनोर टेनमार्गे वळवण्यात आली आहेत किंवा जोगेश्वर विक्रोळी लिंक रोडने पश्चिम द्रृतगती मार्गाने जातील

४.नवी मुंबईकडून गुजरात किंवा नाशिककडे जाणारी जड-अवजड वाहने कर्जत- मुरबाड-शहापूर मार्गे नाशिककडे तसचं आटगांव-आबिटघर-वाडा-पाली-विक्रमगड-मनोर टेन नाका- गुजरात मार्गे वळवण्यात आली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार असलेल्या १२,२२६ कोटींच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ठाणे मेट्रोचाही समावेश आहे. ज्यामध्ये २९ किमी मार्गावर २० स्थानकं आणि २ भूमिगत स्थानकं असतील. त्यानंतर, पंतप्रधान ठाण्याच्या कसरावरवली भागातील वालावलकर मैदानावरील रॅलीला संबोधित करणार आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार रॅलीसाठी सुमारे ४०,००० लोक उपस्थित राहतील, ज्यांच्यासाठी १,२०० बस व्यवस्था करण्यात आली आहे. यात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग असणार आहे. सध्या सत्ताधारी महायुती सरकारने महिलांसाठी काही लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली आहे, ज्यात मुख्यमंत्री माझी मुलगी बहीण योजनेचा समावेळ आहे, ज्याअंतर्गत गरीब महिलांना महिन्याला १,५०० रुपये दिले जात आहेत.

मुंबईकरांना अपेक्षित असलेल्या मेट्रो ३ किंवा आकाश लाइनचा वापर पंतप्रधान उद्घाटन केल्यानंतर सुरू होणार आहे, ज्यात आरे-बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) टप्पा समाविष्ट आहे. त्यात १० स्थानकं असतील. या शहराच्या पहिल्या भूमिगत मेट्रो लाइनचा उर्वरित भाग, जो दक्षिण मुंबईतील कोलाब्यापर्यंत जातो, मार्च २०२५ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.

कोलाबा-बांद्रा-SEEPZ मेट्रो मार्गासाठी ३३.५ किमी लांबीच्या प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ २६ ऑगस्ट २०१४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन केंद्रीय शहरी विकास मंत्री वेंकैया नायडू यांच्या उपस्थितीत झाला होता. या प्रकल्पाचे काम २१ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरू झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Baba Controversy : साईबाबा काशीतून हद्दपार! 14 मंदिरांमधून हटवल्या साईंच्या मूर्ती; भक्तांमध्ये संताप,VIDEO

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत भाजपला व्होट जिहादचा फटका? देवेंद्र फडणवीसांचा वार; विरोधकांचा जोरदार पलटवार,VIDEO

Atul Kumar case : दलित विद्यार्थ्यासाठी IITचं दार झालं खुलं; सरन्यायाधीशांचा ऐतिहासिक आदेश, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत;ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड, आता परिस्थिती काय? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? फडणवीस-ठाकरेंची मातोश्रीवर भेट? कुणी केला दावा? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT