Liver Transplant : ५ दिवसांच्या मुलीने १३ महिन्याच्या 'आयुष'ला दिलं नवं आयुष्य; २२७ किमीवरून ट्रेनने मुंबईत आणलं लिव्हर

Liver Transplant in Nanavati Hospital : ५ दिवसांच्या मुलीच्या अवयवदानामुळे १३ महिन्यांच्या मुलाला जीवदान मिळालं आहे. विशेष म्हणजे सूरतवरून ट्रेनने लिव्हर मुंबईत आणण्यात आलं. देशातील ही पहिलीच घटना आहे.
Liver Transplant
Liver TransplantSaam Digital
Published On

सूरतच्या एका ५ दिवसांच्या नवजात मुलीच्या अवयवदानामुळे मुंबईतील १३ महिन्याच्या मुलाला नवं आयुष्य मिळालं आहे. नानावटी मॅक्स हॉस्पिटलमध्ये या मुलावर यशस्वी लिव्हर प्रत्यारोपण करण्यात आलं. अवयव दान करणारी मुलगी सूरत येथील असून तिने दान केलेलं लिव्हर ग्रीन कॉरिडोर तयार करून ट्रेनद्वारे मुंबईत आणण्यात आलं गेला. केवळ ३ तासांत लिव्हर मुंबईत पोहोचले. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रेनद्वारे अवयव आणण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुलीच्या पालकांनी या दुःखाच्या प्रसंगातही अवयव दान करून इतर मुलांचे जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुलीचं लिव्हर, दोन्ही किडन्या आणि कॉर्निया इतर गरजू मुलांसाठी पाठवण्यात आल्या. त्या मुलीच आपलं लिव्हर नानावटी मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या आयुष देण्याचा निर्णय घेतला.

आयुष जन्मजात गंभीर आजाराने त्रस्त

हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार, १३ महिन्याच्या आयुषला (बदललेले नाव) ऑगस्ट २०२३ मध्ये क्रिग्लर-नज्जर सिंड्रोम (CNS) आजार झाल्याचं निदान झालं होतं. जन्मजात आजार असल्यामुळे बिलीरुबिनची मात्रा प्रभावित होते. त्यामुळे आयुष्यला वाचवण्यासाठी लिव्हर ट्रांसप्लांट हा एकच पर्याय होता.

३.३० तासांत २२७ किमीचा प्रवास

शनिवारी हॉस्पिटलला ही माहिती मिळाली की मुलीचं लिव्हर दान होणार आहे. डॉक्टरांनी तात्काळ मुलाच्या पालकांना याची माहिती दिली आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास सांगितलं. त्यानंतर रविवारी सकाळी नानावटीच्या ट्रांसप्लांट फिजिशियन, लिव्हर अनेस्थेटिस्ट, नर्स इत्यादींची टीम सकाळी ४:४५ वाजता लिव्हर घेऊन हॉस्पिटलमधून निघाली. टीमने ५:१२ वाजता तेजस एक्स्प्रेस पकडली आणि सकाळी ८:१२ वाजता बोरीवलीत पोहोचली. केवळ ३ तास २७ मिनिटांत २२७ किमीचा प्रवास करीत लिव्हर मुंबईत पोहोचलं होतं. त्यानंतर ग्रीन कॉरिडोर तयार करून लिव्हर नानावटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

Liver Transplant
Crime News : खळबळजनक! ४५ दिवसांपासून मी झोपलो नाही; चिठ्ठी लिहित कर्मचाऱ्याची आत्महत्या

मायक्रोस्कोपिक सर्जरीसाठी १० तास लागले

हॉस्पिटलच्या लिव्हर, पॅनक्रियाज, इंटेस्टाइन ट्रांसप्लांटचे संचालक डॉ. अनुराग श्रीमल म्हणाले की, मुलाचं वय खूपच कमी असल्याने आम्हाला मायक्रोस्कोपिक सर्जरी करावी लागली. या सर्जरीसाठी सुमारे १० तास लागले, पण आनंदाची गोष्ट म्हणजे चाचणी यशस्वी झाली आहे आणि मुलाच्या आरोग्यात सुधारणा होत आहे. विशेष म्हणजे, पूर्व वाढ झालेली मुले किंवा प्रौढांमध्ये लिव्हर ट्रांसप्लांटमध्ये ४ ते ५ तासांचा वेळ लागतो, परंतु १३ महिन्याच्या मुलामध्ये १५० ग्राम लिव्हर ट्रांसप्लांट करणे इतके सोपे नाही.

मुलाच्या मेंदूला नुकसान होण्याची होती शक्यता

हॉस्पिटलच्या पीडियाट्रिक हेपेटोलॉजी आणि गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभागाचे संचालक डॉ. विभोर बोरकर यांनी सांगितले की, मुलाला असलेल्या आजारामुळे बिलीरुबिनची मात्रा वाढते. जर बिलीरुबिन नियंत्रणात राहिला नाही, तर मुलाच्या मेंदूला नुकसान होण्याचा धोका आहे. मुलगा फोटोथेरेपीवर होता आणि लिव्हर ट्रांसप्लांट हा या समस्येपासून मुक्त होण्यासाठी एकच उपाय होता, असं डॉक्टरांनी सांगितलं.

Liver Transplant
Explainer : नाही म्हणायची हीच योग्य वेळ, भारतातील कंपन्यांमध्ये का वाढतोय कामाचा तणाव? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com