Crime News : खळबळजनक! ४५ दिवसांपासून मी झोपलो नाही; चिठ्ठी लिहित कर्मचाऱ्याची आत्महत्या

Uttar Pradesh Tarun Saxena News : कामाचा ताण वाढल्याने एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
Uttar Pradesh Tarun Saxena News
Crime NewsSaam TV
Published On

उत्तर प्रदेशच्या झाशी येथून काळीज पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. कामाचा ताण वाढल्याने एका ४२ वर्षीय कर्मचाऱ्याने स्वत:चं जीवन संपवलं आहे. राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केली असून याचे कारण सांगणारी ५ पानांची चिठ्ठी देखील लिहिली आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Uttar Pradesh Tarun Saxena News
Hathras Crime News : शाळेसाठी दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बळी; हाथरसमधील खळबळजनक घटना

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तरुण सक्सेना असं मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. तरुण बजाज फायनान्समध्ये काम करत होते. येथे त्यांना कर्जाचे ईएमआय गोळा करण्याचे काम देण्यात आले होते. त्यांनी पत्नीसाठी चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये त्यांनी कामात होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला आहे. सोमवारी सकाळी ते त्यांच्या राहत्या घरी मृतअवस्थेत आढळले.

काय आहे चिठ्ठीत

तरुण यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे की, मी गेल्या ४५ दिवसांपासून झोपलेलो नाही. माझ्यावर कामाचा ताण आहे. मला सतत टार्गेट केलं जात आहे. कंपनीने मला दिलेलं टार्गेट मी पूर्ण न केल्याने माझा सतत अपमान केला जात आहे. यामुळे माझं डोकं आता काम करणं बंद झालं आहे. मला काहीही सुचत नाहीये. मी प्रचंड तणावात असल्याने स्वत:चे जीवन संपवण्याचा निर्णय घेत आहे, असं तरुण यांनी आपल्या चिठ्ठीत लिहिलं आहे.

तरुण यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगा आणि मुलगी तसेच आई वडील असा परिवार आहे. त्यांनी राहत्या घरी त्यांच्या मुलांना आणि पत्नीला एका खोलीत बंद करून ठेवले आणि नंतर हे टोकाचे पाऊल उचलले अशी महिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

मम्मी पप्पा माझी ही इच्छा पूर्ण करा

तरुण यांनी चिठ्ठीमध्ये पुढे लिहिलं की, मी हे जग सोडून जात आहे. तुम्ही माझ्या पत्नीची आणि मुलांची काळजी घ्या. मी आजवर तुमच्याकडे काहीच मागितलं नाही. मात्र आता मागतो आहे. मुलांना देखील खुप शिका आणि मोठे व्हा. तसेच आपल्या आईला संभाळा असंही तरुण यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे.

सोबतच माझ्या मृत्यूनंतर कुटुंबाला विम्याचे पैसे मिळतील असंही त्यांनी या चिठ्ठीत लिहिलं आहे. तरुण यांना कामामध्ये सतत अपमानास्पद वागणूक दिली जात होती. काम पूर्ण न झाल्यास सातत्याने पगार कापला जाईल असं सांगितलं जात होतं. कामाच्या दबावाने त्यांनी टोकाची भूमिका घेतली असं चिठ्ठीत लिहिण्यात आलं आहे. बजाज फायनान्सने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Uttar Pradesh Tarun Saxena News
Wardha Crime: हिंगणघाटात पोषण आहाराच्या काळाबाजार; १ लाख १ हजार ६१५ रुपयांचा धान्यसाठा जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com