Hathras Crime News : शाळेसाठी दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बळी; हाथरसमधील खळबळजनक घटना

Crime News : हाथरसमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. शाळेची प्रगती व्हावी म्हणून एका इय्यता दुसरीत शिकणाऱ्या मुलाचा बळी देण्यात आला आहे.
Crime News
Hathras Crime NewsSaam TV
Published On

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये शाळेची प्रगती व्हावी यासाठी शाळेतील संचालकाने आणि त्याच्या वडिलांनी एकत्र येत एका विद्यार्थ्याचा बळी दिला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृतार्थ असं हत्या झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता. तो शाळेत असलेल्या हॉस्टेलमध्येच रहायचा. गेल्या आठवड्यात येथेच त्याची हत्या करण्यात आली. हत्या झाल्याची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली.

Crime News
Crime News: धक्कादायक! स्कूल बॅग घरी विसरल्यामुळे शिक्षकाने दिली भयंकर शिक्षा, कपडे काढले अन्....

कुटुंबिय मुलाच्या शाळेत पोहचताच येथील संचालकाने कृतार्थचं शव गाडीत भरून तेथून पळ काढला. अंधश्रद्धेमधून या विद्यार्थ्याचा बळी गेला आहे. शाळा संचालक आणि त्याच्या वडिलांना इयत्त दुसरीच्या काही विद्यार्थ्यांचा बळी द्यायचा होता. पोलिसांनी आरोपींना अटक केल्याने त्यांचा हा सर्व प्लान फ्लॉप झाला आहे.

दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. घटनेत आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात ५ जणांना अटक केलीये. तसेच शाळेच्या परिसारातून पोलिसांनी तंत्रमंत्रासाठी वापरलं जाणारं सामान सुद्धा जप्त केलं आहे. संचालकाने शाळेच्या प्रगतीसाठी कर्ज घेतलं होतं. कर्ज घेऊन आणि बळी दिल्याने आपली आणि शाळेची प्रगती होईल असा समज त्याच्या मनात होता.

मुलाचा बळी देण्याआधीच मृत्यू झाला. शाळेतून त्याला बाहेर घेऊन जाताना अर्ध्या रस्त्यात त्याला जाग आली होती. जाग येताच त्याने स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी धडपड केली. यामध्ये नराधमांनी त्याचा गळा आवळला आणि त्यामुळे या दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

Crime News
Wardha Crime: रेस्क्यू ऑपरेशन करताना आढळले ३ मृतदेह, वर्ध्यातील घटना; परिसरात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com