Explainer : नाही म्हणायची हीच योग्य वेळ, भारतातील कंपन्यांमध्ये का वाढतोय कामाचा तणाव? वाचा सविस्तर

Working Hours in India : चारच महिन्यांपूर्वी नोकरीवर रुजू झालेल्या ॲनाच्या मृत्यूमुळे कॉर्पोरेट जगताला धक्का बसला आहे. कामाच्या तणावातून तिचा मृत्यू झाल्याचं मानलं जात असून गेल्या एका वर्षात 2 लाख भारतीयांचा अतिकामामुळे मृत्यू झाला आहे.
Explainer
ExplainerSaam Digital
Published On

चांगला पगार, कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण, घरापासून एका तासाच्या अंतरावर ऑफीस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ८ तास काम आणि मागेल तेव्हा सुट्टी, नोकरी करणाऱ्या प्रत्येकाची ही अपेक्षा असते...पण अॅना सबॅस्टियन पेराइल या 26 वर्षीय चार्टर्ड अकाऊंटंटचा नोकरी लागल्यानंतर चारच महिन्यात मृत्यू झाला आणि खरंच भारतात अशी परिस्थिती आहे का? भारतातील लोक किती तास काम करतात? त्याचा मोबदला किती मिळतो? कामावर यायला जमत नाही म्हणायची सवय असली पाहिजे का? थोडं कमी काम केलं पाहिजे का? असे हजारो प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट

अॅना सबॅस्टियन पेराइल ही 26 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट, जीने चारच महिन्यांपूर्वी EY मध्ये नोकरी मिळवली होती आणि तिचा आता हॉर्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. त्यावर तिच्या आईने EY इंडियाच्या चेअरमनला खरमरीत पत्र लिहिलं आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे. पत्र लिहून कामाच्या तणावावरून मत्यू झाल्याचं म्हटलं आहे. अॅना, शाळा आणि कॉलेजमध्ये नेहमीच अव्वल होती आणि तिने CA परीक्षा डिस्टिंक्शनसह पास केली होती. त्यासाठी तिने अथक परिश्रम घेतले होते. त्यामुळे तिने बॉसने कामावर बोलवलं तरी नाही म्हणता येत नव्हतं, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

भारतातील लोक सर्वाधिक कष्टाळू

गेल्या वर्षी McKinsey ने एक अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालात भारतातील जवळपास 60% लोकांना अतिकामामुळे थकावा जाणवत असल्याचं म्हटलं आहे. ३० देशांमध्ये याचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. 2019 च्या एका अहवालात, मुंबई जगातील सर्वात कष्टाळू शहर म्हणून नोंद झाली होती. या यादीत दिल्ली चौथ्या क्रमांकावर होते. दुसऱ्या क्रमांकावर हुनोई आणि तिसऱ्या क्रमांकावर मेक्सिको सिटीचा क्रमांक होता. तर 2018 च्या एका सर्वेक्षणात, जगात सर्वात कमी सुट्या भारतीयांना मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

अकाली मृत्यूचं प्रमाण वाढलं?

2021 मध्ये, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) जास्त वेळ काम करण्याच्या परिणामांवर एक अभ्यास प्रकाशित केला. या अहवालात आठवड्यात 55 तास किंवा त्याहून अधिक काम करणे, आठवड्यात 35-40 तास काम करण्याच्या तुलनेत अकाली मृत्यूचा धोका जास्त आहे. त्यावेळी प्रमाणापेक्षा अधिक वेळ काम केल्यामुळे ताणतणावाच्या ममस्स्यांमुळे सर्वाधिक मृत्यू भारताता झाल्याचं समोर आलं होतं. कोणत्या देशात झाले? भारतात. हे केवळ लोकसंख्येच्या आकारावर आधारित नव्हते कारण भारतातील आकडे चीनच्या तुलनेत खूपच वाईट आहेत.

Explainer
Explainer : ३.८ दशलक्ष हेक्टरवरील जंगल नष्ट, १० दशलक्ष चौकिमीवर विषारी ढग; का धुससतेय दक्षिण अमेरिका? वाचा सविस्तर

49 तासांचा आठवडा

ILO च्या माहितीनुसार, नोकरी करणाऱ्या भारतीयांपैकी निम्म्याहून अधिक (51.4%) आठवड्यात 49 तास किंवा त्याहून अधिक काम करतात. भूतान (61.3%) नंतर जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आठवड्याच्या सरासरी कामाच्या तासांबाबात (46.7%) भारत 170 देशांमध्ये 13 व्या क्रमांकावर आहे. कांगो आणि बांगलादेश यासारख्या कमी उत्पन्न असलेल्या देशांपेक्षाही भारत मागे आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिरात आणि कतार या अधिक उत्पन्न असलेले देशांचा समावेश होतो.

काय आहे टॉक्सिक '996' कामाची संस्कृती?

भारतात हाय प्रेशर कामाच्या तुलनेत जीनच्या जवळ आहे. चीनमध्ये टॉक्सिक '996' कामाची संस्कृती आहे. तेथे लोक आठवड्यात सरासरी 46 तास काम करतात. चीनची '996' कार्यसंस्कृती म्हणजे सकाळी 9 वाजता ते रात्री 9 वाजेपर्यंत, आठवड्यात सहा दिवस काम करणे. चीनमधील टेक उद्योगातील टायकून जॅक मा यांनी याचे कौतुक केले होते.

माहिती आणि संवाद क्षेत्राची स्थिती सर्वात वाईट

भारताच्या माहिती आणि संवाद क्षेत्राची स्थिती तर सर्वात वाईट आहे. ILO च्या आकडेवारीनुसार या क्षेत्रातील कर्मचारी आठवड्यात 57.5 तास काम करतात, जे आंतरराष्ट्रीय कामगार आदेशापेक्षा सुमारे नऊ तास जास्त आहेत. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक वर्गीकरणाच्या मानकांनुसार 20 क्षेत्रांपैकी 16 क्षेत्रांमध्ये कर्मचारी आठवड्यात 50 तास किंवा त्यापेक्षा जास्त काम करतात. त्यामुळे भारतातील व्यावसायिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक कार्यांमध्येही आठवड्यात 55 तास काम केलं जाते. फक्त शेती आणि बांधकाम यांसारख्या श्रमप्रधान क्षेत्रचं आठवड्याला 48 तास काम करतात.

तरुण सर्वाधिक 58 तास काम करतात

ILO च्या आकडेवारीनुसार तरुण कर्मचारी त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांपेक्षा अधिक तास काम करतात. 20 व्या वर्षापर्यंत, भारतीय कर्मचारी आठवड्यात सुमारे 58 तास काम करतात. 30 च्या मध्यापर्यंत ते सुमारे 57 तास काम करतात. ५० वर्षांच्या आसापास यात घट होते मात्र तेही ५३ तास काम करतात.

GDP मध्ये किती योगदान आहे?

भारतात कामाचा प्रत्येक तास GDP मध्ये 8 डॉलरचं योगदान देतो. त्यामुळे केवळ जास्त तास काम केलं म्हणजे पैसे कमावता येत नाहीत तर जो काम करतो तो उत्पादक असला पाहिजे तरच ते शक्य असतं. खूपवेळ काम केल्यामुळे उत्पादकता देखील कमी होते. भारताची 8 डॉलर पेक्षा कमी मजरी फक्त लहान, कमी उत्पन्न आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांपेक्षा थोडीशी चांगली आहे. भारतदेखील एक मध्यम उत्पन्न असलेली अर्थव्यवस्था आहे, परंतु या आकाराच्या अर्थव्यवस्थेसाठी 8 डॉलर प्रति तास खूप कमी आहेत. व्हिएतनाममध्ये हीच मजुरी 9.8 डॉलर प्रति तास आहे, फिलिपिन्समध्ये 10.5 डॉलर आणि इंडोनेशियामध्ये 13.5 डॉलरआहे. चीनमध्ये हे 15.4 डॉलरआहे. मात्र अधिक उत्पन्न असलेल्या देशांच्या तुलनेत खूपच कमी मानलं जातं. त्यामुळे जास्तवेळ केवळ ताण वाढवतात, उत्पादकता नाही, असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

Explainer
Special Story : 'लाडक्या बहिणीं'साठी राज्य सरकारांची स्पर्धा; कोणत्या राज्यात किती दिले जातात पैसे? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com