Platform Ticket Pune Junction
Platform Ticket Pune Junction Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरात मोठी वाढ; विनाकारण गर्दी न करण्याचे रेल्वेचे आवाहन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर, पुणे

Pune Junction News: पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. रेल्वे स्टेशनवरील अकारण गर्दी रोखण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिट दरात वाढ करण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे. (Pune Latest News)

विशेष म्हणजे पुणे (Pune) रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मचे तिकीट हे रू. 10/- वरून वाढवून रु. 30/- दराने देण्यात येईल. हा कायमस्वरुपी निर्णय नाही. सध्या केवळ दिनांक 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंतच्या कालावधीत हे बदल असतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

दिवाळीनिमित्त (Diwali) राज्यभरातील नागरिकांनी गावी जाण्यासाठी एसटी स्टॅंडसह रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी केली आहे. याच गर्दीमुळे पुण्यातील (Pune) रेल्वे स्टेशनवर (Railway station platform) चेंगराचेंगरीत गाडीमध्ये चढणाऱ्या साजन बलदेवन या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी काल समोर आली होती. मात्र, साजन बलदेवन याचा मृत्यू चेंगराचेंगरीत मृत्यु झाला नसून, दम्याच्या आजारामुळे सदर प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने (Pune Railway Division) केला. साजन बलदेवन हा काल पुणे दानापूर एक्सप्रेसने (Pune Danapur Express) प्लॅटफॉर्म नंबर एक वरून बिहारला जाणार होता.

मात्र, बिहारला (Bihar) जात असताना त्याची प्रकृती रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच अतिशय खालावली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने केला आहे. साजन बलदेवन सोबत असलेल्या त्याच्या इतर सहकारी मित्रांनी देखील त्याला दम्याचा आजार असल्यास पोलीस पुणे रेल्वे पोलीस विभागाला कळवलं आहे.

प्रवाशाच्या या मृत्यूबाबत रेल्वे प्रशासनानं स्पष्टीकरण दिलं असलं तरी आता रेल्वे प्रशासनाला प्लॅटफॉर्मवर होणारी दर्दी टाळायची आहे. त्यामुळे आता पुणे रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मचे तिकीट हे 30 रुपये दराने केले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Water Crisis: बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Nagpur Earthquake : नागपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर २.५ इतकी तीव्रता; नागरिकांमध्ये घबराट

उदयनराजे भाेसलेंसाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस साता-यात; शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार आज पुन्हा पावसातील सभेच्या मैदानावरुन काेणती साद घालणार?

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT