IND vs PAK T20 Cricket Betting : विराट कोहलीच्या खेळीने विदर्भातील क्रिकेट बुकी क्लीन बोल्ड

Cricket Betting In Vidarbha: कोहलीच्या 'विराट' खेळीने विदर्भातील क्रिकेट बुकी क्लीन बोल्ड झाले असून ऐन दिवाळीत त्यांचं दिवाळं निघालं आहे.
IND vs PAK T20 World Cup
IND vs PAK T20 World CupSaam TV
Published On

Cricket Betting News: IND vs PAK T20 विश्वचषकात काल, रविवारी भारताचा मुकाबला पाकिस्तान संघासोबत झाला. अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यांत भारतीय संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला. विराट कोहली हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग हे विजयाचे हिरो ठरले. या विजयासह भारताने (Team India) गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. या पराभवामुळे पाकिस्तानचे खेळाडू तर नैराश्येत आहेच, पण भारतातील क्रिकेट बुकीही नैराश्येत गेले आहेत. त्याचं कारण म्हणजे कोहलीच्या 'विराट' खेळीने विदर्भातील क्रिकेट बुकी क्लिन बोल्ड झाले असून ऐन दिवाळीत त्यांचं दिवाळं निघालं आहे. (Nagpur Patest News) 

भारत-पाकिस्ताना क्रिकेट सामना जगात सर्वात स्पशेल असतो. क्रिकेट मॅचच्या या सामन्याला जणू युद्धाचे स्वरूप येते. त्यामुळे कालचा टी-२० विश्व चषक सामना म्हणजे क्रिकेट बुकींसाठी पर्वणी होता. कालच्या भारत आणि पाकिस्तानमधला क्रिकेट सामना सट्टा (Cricket Betting) बाजारात रेकॉर्डब्रेक करणारा होता. दिवाळीचा सण आणि त्यात रविवार असल्याने या सामन्यासाठी क्रिकेट बुकींनी आधीच तयारी करून ठेवली होती. त्यासाठी पंटरसह (बेट स्विकारणारे व्यक्ती) विविध प्रकारचे अॅप्स आणि सॉफ्टवेअर्स या क्रिकेट बुकींनी वापरले.

IND vs PAK T20 World Cup
Railway Accident : अमरावती जिल्ह्यात रेल्वेचा मोठा अपघात २० डबे रुळावरुन घसरले

सूत्रांच्या माहितीनुसार, मॅचच्या सुरुवातीला जेव्हा दोन्ही टीम मैदानात आल्या त्यावेळी बुकींनी भारताचा रेट ६० पैसे ठेवला होता. अर्थात भारताच्या बाजुने एक लाख लावल्यास आणि भारत जिंकल्यास पेसै लावणाऱ्याला ६० हजार रुपये मिळणार होते. पाकिस्तानची पहिली विकेट गेली तेव्हा हा रेट ४० पैशावर आला. त्यानंतर पहिला डाव संपला तेव्हा मध्य भारतातील सट्टा बाजारात दोन ते अडीच हजार कोटींची खयवाडी - लगवाडी झाली होती.

IND vs PAK T20 World Cup
Kokan : कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेसमधील चित्र पाहिलं अन् काेकणवासीयांना बसला धक्का, मग काय...

तीन षटकांचा खेळ बाकी असताना भारत ही मॅच गमावतो की काय अशी स्थिती होती, त्यामुळे बुकींनी पाकिस्तानच्या जिंकण्यावर मोठ्या प्रमाणात पैसे लावले. मा मात्र, अखेरच्या तीन चेंडूत विजयासाठी १३ धावा हव्या असताना कोहलीने षटकार ठोकला आणि नंतर हा सामना जिंकला. उत्कंठा वाढवणाऱ्या या भारताच्या विजयाने क्रिकेट बुकींचे धाबे दणाणले. विदर्भातील मोठमोठे बुकी शेकडो कोटी रुपये हरले त्यामुळे ऐन दिवाळीत त्यांचं दिवाळं निघाल्याने ते नैराश्येत असून कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. यावेळी मात्र भारताच्या बाजूने बेटींग करणारे बुकी मालामाल झाले आहेत. भारताच्या विजयाने या सट्टेबाजांची चांदी झाली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com