Pimpari-Chinchwad Curfew Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, १४ दिवसांसाठी जमावबंदी; काय सुरू अन् काय बंद?

Pimpari-Chinchwad Curfew: पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्वाची बातमी आहे. १४ दिवसांची जमावबंदी आणि मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. नियमांमध्ये नेमकं काय? ते वाचा...

Priya More
  • पिंपरी-चिंचवडमध्ये १० जून ते २३ जून २०२६ दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू

  • ५ पेक्षा जास्त लोकांचा जमाव, सभा आणि मिरवणुकींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

  • शस्त्रे, स्फोटके, दाहक पदार्थ आणि प्रक्षोभक घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे.

  • आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई होणार आहे.

पिंपरी-चिंचवडकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये १४ दिवसांची जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १० जून २० रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २३ जून २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

१४ दिवसांच्या कालावधीमध्ये खालील कृत्याला असणार बंदी -

- कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे.

- दगड अथवा शस्त्रे किवा अस्खे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे आणि साधने बरोबर नेणे.

- शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका आणि शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.

- कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन आणि दहन करणे.

- मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

- राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे.

- कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे.

- ज्या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पध्दतीने कलम ३७(१) आणि (३) विरुध्द वर्तन करणे.

- कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये ५ पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे.

- पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचे पूर्व परवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणुका काढणे

दरम्यान, पोलिसांनी १४ दिवसांसाठी जारी केलेल्या जमाव बंदीच्या आदेशाचे पालन करण्यास सांगण्यास आले आहे. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना आणि ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार वाळगणे आवश्यक आहे आणि त्याबबात परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन १९५१ 1 चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिरूरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

नॉनव्हेज खाल्ल्यानंतर 'हे' 4 पदार्थ खाल्ल्यास शरीराची लागेल वाट

Subodh Bhave: परदेशातही 'वीण दोघांतली ही तुटेना'; फॅमिली हॉलिडे अन् मालिकेचं शूट, सुबोध भावेसाठी मुलांची कॅमेऱ्यामागची धावपळ

दागिन्यांच्या हव्यासापोटी नातेवाईक महिलेचा निर्घृण खून; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला

चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT