गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
Signature Park Society Wakad incident : पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. 'सिग्नेचर पार्क' या इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने तिच्या चिमुकल्या मुलासह आत्महत्या केली आहे. कौटुंबिक कलह, आर्थिक अडचण किंवा नैराश्य (Depression) यांसारख्या कारणांमुळे हे टोकाचे पाऊल उचलले गेले का, याचा पोलीस तपास करत आहेत.
एकता भांगड (वय ३३ वर्षे) आणि माधव भांगड (वय ६ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकांची नावे आहेत. एकता भांगड या पती मनोज भांगड आणि मुलगा माधव याच्यासोबत मागील काही वर्षांपासून वाकड येथील 'सिग्नेचर पार्क' या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत होत्या. मात्र, आज संध्याकाळी एकता यांनी आपल्या ६ वर्षांच्या मुलासह इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून अतिशय टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. एकता भांगड यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून वाकड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. कौटुंबिक वाद, नैराश्य किंवा इतर काही वैयक्तिक कारणे यामागे आहेत का, यादृष्टीने पोलीस आता मृत महिलेच्या पतीसह नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडे चौकशी करत आहेत.
गगनचुंबी इमारतीवरील या दुर्दैवी घटनेमुळे वाकड आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या प्रकारामुळे 'सिग्नेचर पार्क' सोसायटीसह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू असून, मृत मायलेकांचे शवविच्छेदन करण्यासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.