Maharashtra Politics : ६ महिन्यात सत्ता उलटून टाकू, शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा

Tanaji Sawant, Dharashiv Zilla Parishad : धाराशिव जिल्हा परिषदेमधील सत्ताधाऱ्यांना आमदार तानाजी सावंत यांनी सहा महिन्यांत सत्ता उलटवण्याचा इशारा दिला आहे. शिवसेनेच्या सदस्यांना वेटबिगार किंवा गुलाम समजून काम सांगितल्यास थेट निषेध नोंदवा, असे आवाहन त्यांनी केले.

सत्तेचा माज आम्ही खपवून घेणार नाही, 6 महिन्यात सत्ता उलटून टाकू असा इशारा आमदार तानाजी सावंतांनी दिला आहे. मनमानी आणि 'हुकुमशाही पद्धतीने सत्ता चालवू नका असंही ते म्हणालेत.

जिल्हा परिषद मधील सत्तेचा माज आम्ही खपवून घेणार नाही अन्यथा सहा महिन्यात सत्ता उलटून टाकू, असा इशारा आमदार तानाजी सावंत यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटीलांना नाव न घेता दिला. सत्ता फक्त तुमची नाही, सत्ता आमचीही आहे म्हणत मनमानी व हुकुमशाही पद्धतीने सत्ता चालवू नका, असे त म्हणाले.

धाराशिव जिल्हा परिषदेमधील सत्तेचा माज आम्ही खपवून घेणार नाही. शिवसेनेच्या सदस्यांना वेटबिगार समजले तर सहा महिन्यांत सत्ता उलटवून टाकू, असा थेट इशारा शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि अर्चना पाटील यांचे नाव न घेता दिला आहे.

ही सत्ता एकट्या तुमची नाही, तर आमचीही आहे. मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कारभार करू नका. वेटबिगार आणि गुलाम समजून काम सांगितले तर ते करू नका, थेट निषेध नोंदवा, असे आदेश तानाजी सावंत यांनी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांना दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.