Pimpri-Chinchwad Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri-Chinchwad News : गाझा पट्टी नाही, पिपंरीच्या कुदळवाडीत मोठी कारवाई, २५० एकरवरील बांधकामं भुईसपाट

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातल्या कुदळवाडी परिसरात महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. महापालिकेने २५० एकरवर पसरलेले अनधिकृत बांधकाम जेसीबी आणि बुलडोजने जमीनदोस्त केले आहे.

Yash Shirke

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पिंपरी चिचवडमध्ये महापालिकेने ५००० अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. जेसीबी मशीन, बुलडोजरच्या सहाय्याने पिंपरी चिंचवड शहरातल्या कुदळवाडीत पत्राशेड बांधकाम निष्कासणाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे कुदळवाडी परिसर युद्धात उध्वस्त झालेल्या गाझापट्टी सारखा दिसत आहे.

जवळपास २५० एकरावर पसरलेल्या ५,००० पेक्षा जास्त व्यावसायिक बांधकामावर पिंपरी चिंचवड महापालिकेने जेसीबी आणि बुलडोजर मशीन लावून कारवाई केली आहे. महापालिकेने सूड बुद्धीने बांधकाम भुईसपाट केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. आमचे योग्य पुनर्वसन न करता ही कारवाई केली असल्याचे व्यापारी म्हणत आहेत. स्क्रॅप मॅनेजमेंट यार्ड उपलब्ध करुन न देता बांधकाम जमीनदोस्त केल्याचा आरोप कुदळवाडीतल्या व्यापाऱ्यांनी केला आहे.

पिंपरी चिंचवडला ऑटोमोबाईल आणि इंडस्ट्रियल हब अशी ओळख आहे. या इंडस्ट्रीमधून मोठ्या प्रमाणात स्क्रॅप निघतो. हे स्क्रॅप खरेदी करणारे आणि त्यावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योगधंदे कुदळवाडी परिसरात आहेत. आयटी हब अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला उद्योगधंदे हवे आहेत मात्र त्यातून निघणारा स्क्रॅप नकोसा झाला आहे. त्यामुळे कुदळवाडीतले उद्योगधंदे अडचणीत असल्याचा आरोप व्यापारी करत आहेत.

दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकाc आयुक्त शेखर सिंह यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, कुदळवाडी उद्योगधंद्यात बांगलादेशी आणि रोहींगे काम करतात. त्या ठिकाणी वारंवार आग लागल्याच्या घटना घडत आहेत. या परिसरामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. या कारणांमुळे महापालिकेने या परिसरातील बांधकाम उध्वस्त करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे, दिघी आणि भोसरी परिसरातील उद्योगधंदे हे लष्कराच्या रेड झोनमध्ये येतात. तसेच नदीपात्रातील पूर रेषेत देखील मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या रेड आणि ब्लू झोनमधील बांधकामांना सोडून फक्त कुदशवाडी परिसरात कारवाई केल्याने या प्रकरणाबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT